मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने १.७९ लाख कोटींची तरतूद केली होती. त्यामध्येच आज वाढ करत नरेंद्र मोदींनी एकूण २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. हागणदारीमुक्त भारत, कुपोषणमुक्त भारत, स्वच्छ भारत, टीबीमुक्त भारत या गोष्टी जेव्हा भारत पुढे आणतो त्यावेळी जग भारताकडे अभिमानाने बघत असतो या जुन्याच पारंपरिक उदाहरणांचा दाखला मोदी यांनी यावेळी दिला.
तर 4.0 लॉकडाऊन हे होणार असल्याची ही घोषणा केली आहे.
गुलामगिरीतील भारत आता विकासाकडे निघाला असून या प्रवासातही भारताने विश्वकल्याणाचा मार्ग अवलंबला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. जगात ज्या गोष्टी सुधारण्यासाठी भारतीयांची गरज लागेल त्या गोष्टींसाठी भारत नेहमीच सज्ज राहील हे सांगत असताना नरेंद्र मोदींनी कच्छच्या भूकंपाची आठवण करुन दिली.
संकटातून बाहेर पडायचा विचार केला तर आपण ते करुच शकतो याचा पुनरुच्चार नरेंद्र मोदींनी केला.
आत्मनिर्भर भारताची निर्मिती ५ मजबूत घटकांवर अवलंबून असून अर्थकारण, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, विविधता आणि मागणी हे ते घटक असल्याचं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं.
आत्मनिर्भर भारत हेच उद्दिष्ट : पीएम मोदी
देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्ववभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
● लॉकडाऊन 4.0 पंतप्रधान मोदींकडून घोषणा
● लॉकडाऊन 4.0 चे नियम 18 मे पूर्वी कळवण्यात येतील
● स्थानिकांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे
● कोरोनाच्या संकटात स्थानिकांची भूमिका मोठी
● कोरोनामुळे तळागळातील लोकांना खूप काही सहन करावे लागले. त्यांना साहाय्य करायचे आहे
● मेक इन इंडियाच्या संकल्पास सक्षम करा
● उद्या अर्थमंत्री आत्मनिर्भर भारत याविषयी सविस्तर माहिती देतील
● जीडीपीच्या 10 टक्के रक्कम कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी
● सर्वप्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थिक पॅकेज
● आर्थिक पॅकेज, उद्योगधंदे, मजूर, शेतकरी, लघु उद्योग,तसेच दिवसरात्र झटणाऱ्यासाठी आहे
● आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा
● जगातील सर्वोत्तम टॅलेंट भारताकडे
● जीवन आणि मृत्यूच्या लढाईत जगाला भारताकडून मोठ्या आशा आहे
● कोरोनापासून वाचायचं आहे व पुढे जायचं आहे
● दररोज 2 लाख PPE किट, व 2 लाख मास्कची निर्मिती
● आत्मनिर्भर भारत हेच आपलं उद्दिष्ट
● जगात 42 लाखाहून अधिक लोकांना कोरोना झाला
● केवळ एका व्हायरसने जगाला उद्ध्वस्त केले आहे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज