टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सोलापूरकरांमध्ये भीतीचे वातावरण वाढले असून कोरोनाचा कहर वाढतच चालल्याने सोलापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.सोलापुरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. त्यातच आता आज सायंकाळी 7.30 वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, करोनाबाधित 14 नव्या रूग्णांची भर पडली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 83 झाली आहे. तर एकूण रूग्णसंख्याही 865 वर पोहोचली आहे.(solapur corona updated)
आज सायंकाळी 230 जणांची चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यात 5 महिला व 9 पुरुषांना करोनाने बाधित केल्याचे दिसून आले. एकूण रूग्णसंख्येमध्ये 495 पुरूष आणि 370 महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 51 पुरूष व 32 महिला आहेत. मात्र आतापर्यंत 380 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत आढळून आलेले रूग्ण प्रामुख्याने शहरातील असून झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत.रुग्ण आढळणे आणि बरे होण्याच्या प्रमाणात फार मोठी तफावत नसल्याने चिंता मोठी नसली तरी मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. शासकीय रुग्णालयात होणार्या कोरोना टेस्टच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाल्याने रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. महापालिकेने देखील आता स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे.
——————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज