बाळासाहेब झिंजुरटे । समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने चुकीच्या दिशेला जात मोटरसायकलला जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात शिवम भाऊसो चव्हाण वय ७ रा.बेळंकी ता.जत या मुलाचा मृत्यू झाला . तर भाऊसो तुकाराम चव्हाण , रुपाली भाऊसो चव्हाण व ओम भाऊसो चव्हाण हे जखमी झाले.
हा अपघात ६ जून रोजी सकाळी ७ च्या सुमारास सोनंद ता.सांगोला येथे झाला . याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी , भाऊसो तुकाराम चव्हाण रा.बेळंकी ता.जत हे पत्नी रुपाली , मुलगा शिवम व ओम यांच्यासह मोटरसायकलवरून निघाले होते .
सोनंद ता.सांगोला येथील बस स्थानकाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चव्हाण यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली . यावेळी झालेल्या अपघातात शिवम भाऊसो चव्हाण वय सात वर्षे या मुलाचा मृत्यू झाला . तर भाऊसो तुकाराम चव्हाण , रुपाली भाऊसो चव्हाण व ओम भाऊसो चव्हाण हे जखमी झाले .
याप्रकरणी सुदर्शन चव्हाण यांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . अधिक तपास पोहेकॉ करचे करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज