mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास; दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली, फायनान्स कंपनीचा संचालक व कर्मचारी फरार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 25, 2026
in क्राईम, राज्य
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

आधीच अल्पभूधारक शेतकरी, त्यात खरीप हंगाम बुडाला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी नांदेड शहरात उघडकीस आली.

मृताच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून खासगी सावकाराने केलेला खून असल्याचा आरोप करीत पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.

चंद्रकांत शिंदे (४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मुदखेड तालुक्याच्या माळकौठा येथील रहिवासी आहेत. केएफ उर्फ खालसा फायनान्स या खासगी कंपनीच्या चिखलवाडी येथील कार्यालयात चंद्रकांत यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

गेल्या महिन्यात चंद्रकांत यांनी या खासगी फायनान्स कंपनीकडून १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कंपनीने ३ हजार रुपये कापून ७ हजार रुपये शेतकऱ्याच्या हातात ठेवले. यावरून व्याजदर ३० टक्के असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. याच पैशाच्या वसुलीसाठी तगादा सुरु होता. १० हजाराच्या कर्जापोटी ७० हजाराची मागणी केली जात होती.

नातेवाइकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या, कारवाईसाठी आक्रोश

ही घटना उघडकीस येताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. नातेवाईकांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वजिराबाद पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. खालसा फायनान्सचा संचालक व संबंधित कर्मचारी फरार झाले.

चंद्रकांत शिंदे यांना दोन मुले, दोन मुली आहेत. कौटुंबिक कारणासाठी त्यांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र या कर्जानेच त्यांचा बळी घेतला.

अवाजवी व्याजदर, अपहरण, डांबून ठेवणे, मारहाण यासारखे अनेक गुन्हे खालसा फायनान्सच्या यंत्रणेवर दाखल आहेत. अवैध सावकारांचा खुलेआम धुमाकूळ सुरू असताना त्यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला सहकार विभाग आहे कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दोन महिन्यांमध्ये १५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यात दुष्काळाची झळ सर्वाधिक आहे. पावसाअभावी पिके हातून गेल्याने शेतकरी हतबल आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांत १५० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले आहे.

कधी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान तर कधी शेतमालाला भाव नाही. या दुष्टचक्रात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. यातूनच कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे बोलले जाते.

गाडीत बसवून आणले, दोन दिवस डांबून ठेवले

गुरुवारी खालसा फायनान्सचे लोक चंद्रकांत यांच्या गावात गेले होते. तेथून त्यांना गाडीत बसवून नांदेडला आणले. त्यांना दोन दिवस डांबून ठेवले.

शनिवारी सकाळी चंद्रकांत यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत फायनान्स कार्यालयात आढळला. मृताच्या आई व मुलीने टाहो फोडत न्यायाची मागणी केली आहे.

फायनान्स कंपनीने डांबून ठेवून खूनच केला

माझ्या मुलाची आत्महत्या नसून फायनान्स कंपनीने त्याला डांबून ठेवून खूनच केला आहे. दोषींवर खुनाचे गुन्हे दाखल करावे.-सर्जाबाई शिंदे, मृताची आई

नातेवाइकांकडून तक्रार प्राप्त करून कार्यवाही केली जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही. डॉ. नीलाभ रोहन, जिल्हा पोलिस अधीक्षक

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

आनंदाची बातमी! अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार; एका बाजूला उन्हाचा पारा वाढला, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

October 25, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात जमिनीच्या वादातून शेतकरी दाम्पत्याला बेदम मारहाण; महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

October 23, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व; ​हा लढा केवळ मतांचा नाही, तर आपल्या पदवीधर मुलांच्या भवितव्याचा; हर्षदा देशमुखांच्या विजयासाठी सिद्धेश्वर रणेंची साद

October 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 22, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मंगळवेढ्यात थरार! मेहुणीशी दुसरे लग्न केल्याचा राग; जावयावर तलवारीने वार करून जागीच संपवले; तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल

October 22, 2026

कामाची बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 9000 रुपयांपर्यंतची मदत?; संकटात मदतीचा हात, सरकारची विशेष योजना

October 23, 2026
शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

October 19, 2026

जमिनीच्या तुकड्यासाठी नात्यांचा खून! सासर्‍याने सुनेच्या डोक्यात घातला कुऱ्हाडीचा दांडा; सासूने दिली थेट जिवे मारण्याची धमकी

October 21, 2026

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

आनंदाची बातमी! अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार; एका बाजूला उन्हाचा पारा वाढला, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

October 25, 2026
मंगळवेढ्याचे आदर्श शिक्षक सतीश इंगळे सरांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ जाहीर; ​’सूर्योदय फाऊंडेशन’ तर्फे होणार गौरव

मंगळवेढ्याचे आदर्श शिक्षक सतीश इंगळे सरांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ जाहीर; ​’सूर्योदय फाऊंडेशन’ तर्फे होणार गौरव

October 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! २७ ऑक्टोबरला शाळा-अंगणवाड्यांत मिळणार मोफत ‘या’ गोळ्या; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

October 24, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात जमिनीच्या वादातून शेतकरी दाम्पत्याला बेदम मारहाण; महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

October 23, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व; ​हा लढा केवळ मतांचा नाही, तर आपल्या पदवीधर मुलांच्या भवितव्याचा; हर्षदा देशमुखांच्या विजयासाठी सिद्धेश्वर रणेंची साद

October 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..