टीम मंगळवेढा टाईम्स :
पुणे पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते, आमदार रोहित पवार आज, सोमवार दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यादरम्यान मंगळवेढा येथे भव्य संवाद व प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर रणे यांनी दिली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. हर्षदा देशमुख जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा:
वार व दिनांक: सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६
वेळ: सकाळी ०९:०० वाजता
स्थळ: आदित्य पॅलेस, मंगळवेढा

या मेळाव्यात आमदार रोहित पवार हे पदवीधर, शिक्षक आणि तरुण कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार असून निवडणुकीच्या रणनीतीवर मार्गदर्शन करणार आहेत.

महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक व पदवीधर मतदार आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष सचिन नागणे यांनी वतीने करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









