मंगळवेढा टाईम्स न्युज नेट्वर्किंग।
सोलापूर जिल्ह्यातील लोंढे मोहिते वाडी (ता. माळशिरस) येथील शंभर पेक्षा अधिक लोकांच्या आधार कार्डचा वापर करून विविध बँकांमध्ये खाते खोलून, मोबाईल कार्ड काढून फसवणूक केल्याच्या तक्रारी अर्ज नातेपुते पोलीस स्टेशनला ग्रामस्थांनी दिले आहेत.

मोहितेवाडी गावातील रेशन दुकानदार व त्यांचे समवेत दोन अनोळखी इसम घेऊन घरी यायचा व तुमचे रेशन कार्ड बंद पडेल, त्यासाठी ई-केवायसी करावी लागेल.
ईकेवायसी मी करुन देतो असे म्हणून आधार नंबर घ्यायचा व मशीन हाताच्या बोटांचे ठसे घ्यायचा. मोबाईलला फोटो घ्यायचा व तुमचे रेशन कार्ड आता सुरू राहील असे सांगायचा. त्यानंतर शंका आल्याने अथेंटिक हिस्ट्री चेक केली.

हिस्टरी चेक केली असता त्यामध्ये आधार कार्ड वरुन नवीन मोबाईल सिमकार्ड अॅक्टीवेट दिसले, तसेच जिओ पेमेंट बँक, एन.एस.डी.एल. बँकेत अकाउंट अशा प्रकारची खाती सुरु केले असल्याबाबत दिसले.

रेशन दुकानदार व त्याच्या समवेत दोन अनोळखी इसम घेऊन माझे आधार कार्डचा नंबर गैरवापर करुन विविध लोकांनी फसवणूक करण्याचा उद्देशाने असे कृत्य केले असल्याचे नातेपुते पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच विविध खात्यावर कर्ज उचलून फसवणूक केल्याची माहितीही लोंढे मोहितेवाडी ग्रामस्थांनी दिली.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











