टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी)
मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी उद्या, शुक्रवार, दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी मंगळवेढा शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.

या आंदोलनासाठी प्रशासकीय परवानगी मिळावी म्हणून सकल मराठा समाज मंगळवेढा शहर व तालुक्याच्या वतीने प्रांताधिकारी बी आर माळी यांना अधिकृत निवेदन देण्यात आले.
शांततामय मार्गाने आंदोलन
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला तालुक्यातून एकमुखाने पाठबळ दिले जात आहे.

या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात शांततेच्या व लोकशाही मार्गाने कडकडीत बंद पाळण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्थेला कुठेही बाधा पोहोचणार नाही आणि आंदोलन पूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, अशी ग्वाही संयोजकांनी प्रशासनाला दिली आहे.

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
बंद दरम्यान सामान्य नागरिक आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. या आंदोलनातून:

रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा, सर्व शासकीय व खाजगी रुग्णालये, अग्निशमन दल, इतर अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा, पूर्णपणे वगळण्यात आल्या असून त्या सुरळीत सुरू राहतील.

प्रशासनाने आंदोलनासाठी योग्य ठिकाण निश्चित करून सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून मंगळवेढ्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि सर्व घटकांनी या बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा द्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














