मंगळवेढा टाईम्स न्युज ।
पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये पत्नीचा खून करून 17 वर्षीय मुलावर चाकूहल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी झाडाला गळफास घेतल या आरोपीने जीवन संपवले आहे. चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

माजी सैनिक महेंद्र दौंडकर यांनी राजगुरुनगर येथील राहत्या घरात पत्नी दीपा हिचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या 17 वर्षीय मुलगा अथर्व याच्यावर चाकूने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. तर घटनेनंतर महेंद्र दौंडकर हा बेपत्ता होता. त्यांचा शोध घेतला जात असतानाच आज सकाळी चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी त्यांचा मृतदेह आढळून आला.

नदीकाठी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह पोलिसांच्या निदर्शनास आला. याप्रकरणाचा सध्या पोलीस तपास करत आहे. मात्र या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













