मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
राज्यात एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (FDA) कारवाईचा धडाका सुरू असून भेसळयुक्त पदार्थ आणि अस्वच्छतासह खाद्यपदार्थांसदर्भातील मानांकन न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
त्यातूनच, अनेक हॉटेल्स आणि दुकानांना सील ठोकण्यात आल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे, अधिकारी तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) कारवाईचा धसका अनेकांना घेतलाय. मात्र, नवी मुंबईत (Navi mumbai) नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एका गंभीर प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे.

विविध नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील मॅन्युफॅक्चरिंग डेट, बेस्ट बिफोर आणि एक्सपायरी डेटमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून, त्याच खाद्यपदार्थांची विक्री आणि निर्यात केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकास अटक केलीय.

नवी मुंबई गुन्हे शाखेने तुर्भे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एका गोदामावर छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान खाद्यपदार्थांच्या मूळ पॅकेटवरील उत्पादन आणि एक्सपायरीची माहिती तपासण्यात आली असता जुन्या तारखा बदलून पॅकेटवर नव्या तारखा छापण्यासाठी डेट प्रिंटिंग मशीनचा वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अश्या कारखान्यावर संयुक्त कारवाई करण्यात आली. 6 दिवसांत करण्यात आलेल्या तपासणीत एकूण 18 निर्यातदारांचा सुमारे 2 कोटी 46 लाख 53 हजार 354 रुपयांचा माल तपासण्यात आला.

त्यापैकी 11 निर्यातदारांच्या सुमारे 75 लाख 21 हजार 269 रुपयांच्या मालावरील लेबल आणि पॅकेटवरील उत्पादन तारीख, एक्सपायरी/बेस्ट बिफोर तारीख, बॅच नंबर आणि एमआरपीमध्ये बदल केल्याच समोर आलं.
2 आरोपींसह 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई
पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईत तुर्भे पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान तारखा छापण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन, विविध नामांकित कंपन्यांचे खाद्यपदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण 75 लाख 21 हजार 269 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणात जयप्रकाश संचतीराम सिंग, (वय 27 वर्षे) आणि जया नवरंग बहादूर सिंग, (वय 26 वर्ष) तसेच संबंधित 11 निर्यातदार कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाकडून सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











