टीम मंगळवेढा टाईम्स । रोहिणी नक्षत्राने आशादायक सुरुवात केल्यानंतर मृगाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे.उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस पडला. (Strong attendance in North Solapur taluka and solapur district rainfall)
अनेक वर्षांनंतर उत्तर तालुक्यात यंदा जून महिन्यात पहिल्याच दिवशी पाऊस पडला. एक व दोन जून रोजी पावसाने चांगली सुरुवात केली.या पावसामुळे लहान तलावात पाणी साठले आहे.काही ओढ्यातून पाणी वाहिले.
मात्र जागोजागी असलेल्या बंधाऱ्यात अडले. खडकाळ भागाच्या पाण्याने खड्डे भरले. बुधवारी एका रात्रीत ३४.३० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद महारेनकडे झाली आहे. १ ते १० जून या कालावधीत उत्तर सोलापूर तालुक्यात एकूण ५१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
वॉटर कपचा फायदा उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांनी एकजुटीने वॉटर कपमध्ये भाग घेत जलसंधारणाची | कामे केली . याचा फायदा मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी झाला.
कोर्टीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
मान्सूनपूर्व मृग नक्षत्राच्या पावसाने १० जून रोजी कोर्टी आणि परिसरात रात्री ११.३० वाजता चांगलीच हजेरी लावली . बुधवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता अनेक दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे | दिलासा मिळाला.
वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने कोर्टी , पोंधवडी , राजुरी गावात हजेरी लावली . दरम्यान , यंदाच्या मोसमातला हा पहिलाच मोठा पाऊस मानला जातो . या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे . मेघगर्जनेसह झालेल्या पावसात विजांचा कडकडाट सुरु होता.
कोर्टी परिसरात अनेक शेतीच्या तालीत पाणी | साचले . पाऊस सुरु होताच साठवणुकीसाठी केलेल्या कांदा चाळी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली . उजनी काठावरील उसासाठी हा पाऊस फायद्याचा मानला जातो आहे . या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज