mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 11, 2026
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

टीम ​मंगळवेढा टाईम्स :

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची थरारक घटना घडली आहे.

दारूच्या नशेत रोज होणारी शिवीगाळ आणि मारहाणीच्या त्रासाला कंटाळून लहान भावाने हे टोकाचे पाऊल उचलले, ज्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

​नंदेश्वर येथील मोटे वस्तीवर राहणारा कृष्णात धोंडीबा मोटे (वय ३७) हा गेल्या काही वर्षांपासून दारूच्या आहारी गेला होता. दारू पिऊन घरात आई-वडील, पत्नी आणि मुलांना विनाकारण शिवीगाळ करणे आणि

मारहाण करणे हा त्याचा नित्यक्रम झाला होता. त्याच्या याच त्रासामुळे त्याचा लहान भाऊ दत्तात्रय मोटे हा कंटाळून काही काळ बाहेर गावी राहण्यास गेला होता.

​रात्रीचा तो थरार आणि रक्ताचा सडा

दि.​१० एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ च्या सुमारास कृष्णात दारू पिऊन घरी आला आणि त्याने पुन्हा धिंगाणा सुरू केला. त्याने आपल्या पोटच्या मुलाला, श्री यालाही मारहाण केली. घरातील मंडळींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र नशेत असलेल्या कृष्णाने कोणाचेही ऐकले नाही.

​रात्री ११ च्या सुमारास वाद विकोपाला गेला. कृष्णाने घरातील कुऱ्हाड हातात घेऊन ती हवेत फिरवत सर्वांना मारण्याची धमकी देऊ लागला.

यावेळी राग अनावर झाल्याने धाकटा भाऊ दत्तात्रय याने कृष्णाच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि त्याच्या डोक्यात व पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात कृष्णात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

​उपचारापूर्वीच मृत्यू

​रक्तबंबाळ अवस्थेत कृष्णाला तातडीने मंगळवेढा आणि त्यानंतर सांगोला येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

स्वतःच्या मुलानेच मुलाचा खून केल्याची फिर्याद वडील म्हाळू धोंडीबा मोटे (वय ६०) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे.

​या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. आरोपी दत्तात्रय मोटे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने परिसरात भीतीसह हळहळ व्यक्त केली जात आहे.

कौटुंबिक वादाचा असा रक्तरंजित शेवट झाल्याने पुन्हा एकदा व्यसनाधीनतेचा भयानक चेहरा समोर आला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भावाने केला भावाचा खून

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 3, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विसरली सुट्टी; मंगळवेढा तहसीलमध्ये रात्रंदिवस खटपट

November 2, 2026
सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

November 1, 2026
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

गरजू रुग्णांना उपचार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार; सिध्देश्वर आवताडे परिवाराकडून वाढदिवसाचा अनोखा सामाजिक पॅटर्न

November 1, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

​मांजराने उघड केला चोरीचा कट! झोपेत असताना घरात शिरला चोरटा; देव्हाऱ्याखालून सोन्याचे दागिने पळविले; मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल

October 30, 2026
Next Post
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत 'स्वगृही' तर भालके 'नाथांच्या' चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात 'विठ्ठल' कोणाला पावणार?

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 3, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विसरली सुट्टी; मंगळवेढा तहसीलमध्ये रात्रंदिवस खटपट

November 2, 2026
सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

November 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..