mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 28, 2026
in राज्य
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मंगळवेढा टाईम्स न्युज। 

मुदत संपलेल्या ग्रामपंचायती संदर्भात प्रशासकीय अडचण म्हणून राज्य शासनाने विद्यमान सरपंचाचीच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश नुकतेच काढले आहेत.

सरकारच्या या आदेशाला छत्रपती संभाजी नगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नियुक्त्यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिली आहे.

राज्य सरकारच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिका खंडपीठात दाखल झाल्या आहेत. त्यावर सुनावणी दरम्यान खंडपीठानं निवडणूक आयोग, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर यांना नोटीसा बजावल्या आहेत.

तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे नवीन आदेश देवू नयेत. ज्या ठिकाणी आदेश दिले असतील त्या ठिकाणी सरपंचांनी पदभार घेवू नये असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्गमत करावेत.

तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासक नियुक्त केलेल्या ग्रामपंचायतीतील सरपंचांनी कुठलेही आर्थिक निर्णय घेऊ नयेत, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यानंतर शासनाच्या ग्रामविकास विभागाने 20 फेब्रुवारी 2026 रोजी एक अधिसुचना जारी केली.

मुदती संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचाची प्रशासक म्हणून तर उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समिती म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणारी ही अधिसुचना आहे. या अधिसुचनेला याचिकाकर्ते किशोर सुतार व इतरांनी खंडपीठात आव्हान दिले.

खंडपीठात याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. देवदत्त पालोदकर यांनी युक्तीवाद केला. राज्य घटनेच्या कलम 243 (ई) पाच वर्षाची मुदत संपल्यानंतर अशा पद्धतीने सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना प्रशासकाचे अधिकार देता येणार नाही.

असे अधिकार दिल्यास मुक्त व पारदर्शक पद्धतीने निवडणूका होणार नाहीत. अधिसुचना काढताना राज्य निवडणूक आयोगाने कोणत्या प्रशासकीय अडचणीमुळे अधिसुचना काढली हे नमुद केलेले नाही.

केवळ सोयीसाठी अशा पद्धतीने अधिसुचना काढता येणार नाही. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले याची माहिती घेण्याचे खंडपीठाने सांगीतले.

त्यावर मुख्य सरकारी वकिल अमरजितसिंह गिरासे यांनी माहिती घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 753 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंचांनी पदभार घेतले आहेत.

तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मात्र अद्याप ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केलेले नाहीत, असे सांगण्यात आले. त्यानंतर खंडपीठाने नोटीसा बजावतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील नियुक्त सरपंच प्रशासकांनी आर्थिक निर्णय घेऊ नयेत आणि छत्रपती संभाजीनर जिल्ह्यात प्रशासक नियुक्तीचे आदेश निर्गमीत करू नयेत असे आदेश दिले आहेत.

या खटल्यात याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. देवदत्त पालोदकर, ॲड. शुभम खोचे, ॲड. एस. व्ही अदवंत, ॲड. प्रल्हाद बचाटे, निवडणूक आयोगातर्फे ॲड. शरयू धंतुरे यांनी काम पाहिले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सरपंच प्रशासक

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

April 1, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 14, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा