mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 8, 2026
in मंगळवेढा
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक साठीची मतमोजणी उद्या सोमवार दिनांक 9 रोजी होणार असून त्यासाठी मंगळवेढा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

मंगळवेढा तालुक्यात काल शनिवार दिनांक 7 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात सुमारे 65.52 टक्के मतदान झाले असून या निवडणुकीची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम मंगळवेढा या ठिकाणी पार पडणार आहे.

उद्या सोमवारी सकाळी बरोबर 10 वाजता मतमोजणी सुरू होणार असून तत्पूर्वी उमेदवार व प्रतिनिधी यांच्या समक्ष सुरक्षा कक्ष उघडण्यात येईल.

9.45 वाजता मतमोजणी साठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात येईल व त्यानंतर 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

सर्वप्रथम टपाली मतमोजणीला सुरुवात होणार असून त्यानंतर लगेच मशिनवरील मतमोजणी केली जाणार आहे.

मशीनवरील मतमोजणीसाठी 20 टेबल व टपाली मतमोजणी साठी 4 असे एकूण 24 टेबलवर एकाच वेळी मतमोजणी सुरू होणार आहे.
मतमोजणीच्या एकूण 11 फेऱ्या होणार असून प्रथम संत दामाजीनगर गट व त्यातील संत दामाजीनगर गण व बोराळे गण यांची मतमोजणी होईल.

त्यानंतर हुलजंती गट व त्यातील हुलजंती गण व मरवडे गण, त्यानंतर लक्ष्मी दहिवडी गट व त्यातील संत चोखामेळानगर गण व लक्ष्मी दहिवडी गण तसेच सर्वात शेवटी भोसे गट व त्यातील भोसे गण व रड्डे गण याप्रमाणे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल.

एका गटाचे व त्यातील गणांचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी एकदा मतमोजणी कक्षात गेल्यानंतर त्या गटाची पूर्ण मतमोजणी झाल्यानंतरच त्यांना बाहेर येता येणार आहे.

सकाळी 10 ते साधारण दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व गट व गणांचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

मतमोजणी साठी एकूण 168 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून 4 रो ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मतमोजणी साठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवार व प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात आले असून कुणालाही मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही.

मतमोजणी केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

मतमोजणी केंद्राच्या परिसरात मीडिया कक्ष तयार करण्यात आला असून माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी 1 नायब तहसीलदार व 3 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोमवारी होणाऱ्या मतमोजणी साठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झालेली असून मतमोजणी प्रकिया शांततेत पूर्ण केली जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दिली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
Next Post
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; 'समाधान'कारक विजय, विरोधक गारद

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा