मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महापालिकेच्या निवडणुकीत ५१ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. नगरसेविकांच्या या कामकाजात त्यांचे पती किंवा जवळच्या नातेवाइकांचा थेट अथवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप चालणार नाही. यासंदर्भात तक्रार दाखल झाली तर नगरसेविका अपात्र होऊ शकते, असा इशारा राज्य शासनाने दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. या आदेशाचा मूळ उद्देश प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शासनाने आणि न्यायपालिका १९९३ पासून कडक पावले उचलत आहे.

नगरपालिका, महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेविकेच्या कामात अनेकदा त्यांचे पती हस्तक्षेप करतात.

५०% आरक्षण आहे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, यासाठी ही मंडळी अनेकदा महिलेला काही कळत नाही, ती फार शिकलेली नाही, राजकारणाचा अनुभव नाही अशी कारणे देतात. मात्र, शासनाला हे मान्य नाही.

महिलांना कामकाजाचे स्वातंत्र्य द्यावे, त्यांना कामात मदत करावी, मात्र त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट आदेश बजावण्यात आलेले आहेत.

अधिकाऱ्यांशी हुज्जत नको
काही महिला सदस्यांचे पती कामात ढवळाढवळ करतात. कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासोबत चर्चा करताना हुज्जत घालतात. काही प्रकरणात विशिष्ट पद्धतीने कार्यवाही व्हावी यासाठी आग्रह धरतात. राज्य सरकारने या गोष्टींनी अमान्य केल्या आहेत.

खरी कमान पती, नातेवाइकांच्या हाती
अनेक महिला सदस्यांचा कारभार पती, नातेवाईक पाहतात. प्रभागातील विविध कामांसाठी हा हस्तक्षेप मान्य केला जातो. मात्र, प्रशासकीय कामकाजात हा हस्तक्षेप अमान्य करण्यात आला आहे.

पहिला आदेश १९९३ चा
देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात महिला आरक्षण लागू झाले. १९९३ साली अनेक नगरपालिका, ग्रामपंचायती, पालिकेत महिला सदस्यांच्या पतींचा हस्तक्षेप दिसून यायचा.
हे पतीदेव थेट सभेत येऊन बसायचे किंवा भाषण करायचे. त्यामुळे सरकारने २० जुलै १९९३ साली याबाबत आदेश काढून हस्तक्षेप चालणार नाही, असा आदेश दिला होता.
त्यात आणखी कडक पावले उचलीत आता थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात तक्रार झाल्यास महिला सदस्यांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













