मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
कामाचा माणूस अशी ओळख असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार याचं काल बुधवारी विमान अपघातात निधन झालं.
लँडिंगवेळी बारामतीत विमान कोसळले अन् एका युगाचा अंत झाला. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवार यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राज्याच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करत, बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र आज शोकाकुल आहे. अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीकडे रवाना झाले आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आज सकाळी ११ वाजता शासकीय इतमात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लाडक्या अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर बारामतीत लोटला आहे. अजित पवार यांनी जिथून सुरूवात केली, तिथेच अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. राजकारणातील दादा माणूस हरवल्यानं महाराष्ट्रात शोकाकुल वातावरण आहे. आमचा दादा गेला… दादा परत या… अशा भावना बारामतीमध्ये लोकांच्या होत्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्रात शोकाकुल वातावरण झाले. राज्यातील जनसागर बारामतीकडे लोटला. केवळ कार्यकर्तेच नव्हे तर नेत्यांच्याही भावनांचा बांध फुटला. या अपघाताने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दिल्लीत संसद अधिवेशनासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि भगिनी सुप्रिया सुळे या अपघाताचे वृत्त कळताच विशेष विमानाने बारामतीसाठी रवाना झाल्या.
दुर्घटनेची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची विचारपूस केली. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका वद्रा यांनीही पवार कुटुंबीयांशी बोलून सांत्वन केले.

सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार
अजित पवार यांचे पार्थिव २९ जानेवारीला सकाळी नऊपर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या विद्यानगरी चौकात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता निघणारी अंत्ययात्रा रद्द करण्यात आली आहे.
सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अजित पवार यांचे पार्थिव काठेवाडीकडे रवाना झालेय. सुनेत्रा पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व पवार कुटुंबिया काठेवाडीत पोहचलेय.

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ असा तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे, सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
अमित शहा येणार
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बारामतीत येणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन नितीन, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हेही त्यांच्यासोबत असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह राज्यातील अनेक नेते अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहेत.
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब
विमान अपघातानंतर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल संध्याकाळी अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणले गेले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य नागरिकांना आपला शोक अनावर झाला. “अजितदादा अमर रहे” अजित दादा परत या… अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रात्री उशिरा पार्थिव पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














