मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला काल शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
अर्ज भरताना उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आज शनिवार दि.17 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव यांनी दिली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील ४ गट व ८ गणांमध्ये सदर निवडणूक घेतली जाणार आहे. तरी सदर निवडणूकीसाठी नामनिर्दिशनपत्र प्रक्रिया दि.१६/०१/२०२६ ते २१/०१/२०२६ दरम्यान राबविली जाणार आहे.

योग्यरित्या नामनिर्देशन अर्ज भरण्याबाबत दि. दि.१७/०१/२०२६ रोजी संध्याकाळी ठीक ४.०० वाजता तहसील कार्यालय मंगळवेढा येथे मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार यांनी तहसील कार्यालयात, मंगळवेढा उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवेढ्यात पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही
मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी संथ सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यात चार झेडपी व ८ पंचायत समिती गण आहेत. यासाठी उमेदवारी अर्जाची विक्री सुरू असून जिल्हा परिषद गटासाठी एकूण ३२, तर पंचायत समिती गणासाठी १५ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले असले, तरी प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याबाबत अद्याप प्रतीक्षा कायम आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी, संभाव्य आघाड्या व समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गती येण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













