मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
कोणत्याही मुद्रांकाशिवाय आता दोन लाखांपर्यतचे कर्ज शेतकऱ्यांना देणे बँकांसाठी बंधनकारक राहणार आहे. तसा शासनाने आदेश काढला त्याची एक असून, जानेवारीपासून अंमलबजावणीही सुक्त झाली आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांना पीक कर्ज काढताना गहाणखत करावे लागते. तारण किंवा तारण गहाण, हमीपत्र गहाणखत, प्रतिभुती बंधपत्र, रोखपत्र करारनामा यासाठीचे दोन लाखांपर्यंतचे मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.

पाच लाखांपर्यंतच्या कर्जावर दोनशे रुपये रुपयांचा मुद्रांक शुल्क भरावा लागतो. मात्र, दोन लाखांपर्यतच्या कर्जावर कोणताही स्टॅम्प (मुद्रांक) भरावा लागणार नाही.

शेतीविषयक अनेक बाबी असल्या तरी केवळ पीक कर्जाला व दोन लाखांपर्यतच्या कर्जाला मुद्रांक शुल्क भरावा लागणार नाही. या अगोदर एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जाला मुद्रांक शुल्क घेतले जात नव्हते.

हीच मर्यादा दोन लाखांपर्यंत करण्यात आली आहे. यामुळे कर्ज प्रक्रिया आणखीन सुलभ झाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कागदपत्रांची कटकट कमी झाली आहे.
सर्व बँकांसाठी बंधनकारक
राज्य शासनाचा हा दोन लाखांपर्यंतच्या मुद्रांक माफीचा आदेश शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देणाऱ्या सर्वच बँकांना लागू होणार आहे. याशिवाय सहकारी संस्थांनाही याचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. याचा फायदा अल्पभूधारक तसेच मध्यम शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

शासनाच्या या सुधारित नव्या आदेशाची अंमलबजावणी नव्या वर्षात (एक जानेवारीपासून) सुरू झाली आहे.
शेतीसाठी पीक कर्ज काढणे सोपे होण्यासाठी शासनाने दोन लाखांपर्यंतच्या कर्जाला मुद्रांक शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून सुरू झाली आहे. या आदेशाचे पालन सर्वच बँकांनी करायला हवे. बँकांनी अडचण केल्यास तक्रार करावी.- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











