mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारत चीन संघर्ष : पंतप्रधानांची आज सर्वपक्षीय बैठक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
भारत चीन संघर्ष : पंतप्रधानांची आज सर्वपक्षीय बैठक

मंगळवेढा टाईम्स टीम । पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली होती. भारतातील विविध पक्षाचे प्रमुख या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. India -China conflict: All-party meeting of PM today

सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. तसंच भारताच्या जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहितीही समोर आली आहे.

संरक्षण मंत्र्यांचीही चर्चा

सर्वपक्षीय बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीदेखी विरोधी पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा केली आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा केल्याची माहितीही समोर आली आहे.

 तर चोख प्रत्युत्तर

गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात युद्धसदृश स्थिती निर्माण झाल्याने उभय देशांदरम्यान संबंध ताणले गेले आहेत. या संघर्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाष्य केलं. गलवान खोऱ्यात भारतीय जवान शहीद झाल्याने अतीव दु:ख झाले आहे. त्यांनी आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना बलिदान दिलं आहे, अशा शब्दांत मोदींनी शहीद जवानांबद्दल सद्भावना व्यक्त केली होती. भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारताने कधीही कोणत्याही देशाला डिवचलेले नाही, तो भारताचा स्वभावही नाही. पण, भारत अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड करणार नाही. अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करताना भारताने आधीही आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. भारताने प्रत्येक वेळी आपली ताकद दाखवून दिली आहे, असे मोदी म्हणाले होते.

देश जवानांचे बलिदान विसरणार नाही : राजनाथ सिंह

गलवान खोऱ्यात जवान शहीद झाले, ही घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आणि वेदनादायी आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी शौर्याने लढलेल्या या जवानांचा प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. भारतीय लष्कराच्या अत्युच्च परंपरेचे प्रदर्शन करत त्यांनी देशासाठी बलिदान दिले. देश त्यांचे शौर्य आणि बलिदान कधीही विसरणार नाही, असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
जम्मू-काश्मीर : शोपियांमध्ये धुमश्चक्री आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीर : शोपियांमध्ये धुमश्चक्री आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 15, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा