मंगळवेढा टाईम्स न्युज ।
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आज २ डिसेंबर रोजी होणार आहेत. मात्र जवळपास २४ ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकल्यात आल्या आहेत.
नगराध्यक्षपद आणि शेकडो प्रभागातील नगरसेवकपदाच्याही निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची, उमेदवार नाराज झालेत.

निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली होती. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही या निर्णयावर संतापले होते. यासाठी त्यांनी राज्य सरकारलाच जबाबदार धरले.

विरोधकांची टीकेनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिलंय. सर्व बाजूंचा विचार करुन आणि कायदेशीर सल्ला घेऊन काही निवडणुका पुढे ढकलल्या, असं राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे.

राज्यातील एकूण २४ नगरपालिका आणि दीडशे सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुका २० डिसेंबरला होणार आहेत.

मात्र या निर्णयाचा सध्याच्या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाने म्हटलंय. १७ १ (ब) तरतुदीनुसार उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं होतं.

अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे ठराविक निवडणुका पुढे ढकल्याची माहिती आयोगामधील सूत्रांकडून देण्यात आलीय.
ज्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत त्यांना नियम ‘क’ आणि ‘ड’ प्रमाणे पुरेसा वेळ देण्यात आलाय. त्यानुसार पुढे ढकललेल्या निवडणुका २० डिसेंबर रोजी घेण्यात येत आहेत.

राज्यातील २४ नगरपालिकामधील नगराध्यक्ष आणि १५० च्या जवळपास सदस्यांच्या प्रचार खर्चाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने विचाराधीन ठेवलाय. याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












