मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने अनेक निर्णय घेतले आहेत. बाजार समितीच्या कारभाराबाबत अनियमितता असून, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकामार्फत चौकशी करण्याची मागणी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
सन १९९५ मध्ये बाजार समितीमध्ये अनामत रक्कम २० हजार भरून गाळे बांधकाम करण्यात येईल व ९९ वर्षे करारावर व्यवसायासाठी दिले जाईल असे सांगितले. गाळ्याचे बुकिंग केले, पण प्रत्यक्षात नऊ वर्षांचा करार केला. यामध्ये ३५० रुपये भाडे ठरले. २०१२ मध्ये भाडे १००० रुपये वाढवून पाच टक्के दरवर्षी भाडेवाढ करण्याचे ठरविले. त्यानंतर २०१८मध्ये भाडे वाढविले.

मात्र, भाडेवाढ करताना त्यांनी कुणालाही लेखी करार दिला नाही. त्याची मंगळवेढा निबंधकाकडे लेखी तक्रार दिली असता त्यांनी सुनावणी ठेवून लेखी करार देण्याचे आदेश मंजूर केले. याबाबत व्यापाऱ्यांनी मंगळवेढा न्यायालयात दाद मागितली आहे.

सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या निर्णयाला बाजूला ठेवत बाजार समितीचे संचालक मंडळ मनमानी कारभार करीत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवेढा बाजार समितीच्या गाळेधारक व्यापाऱ्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा घडवून त्यांना निवेदन दिले
बाजार समिती आवारातील व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ बाजार समितीची तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घालून द्या म्हणून आले होते. त्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा घडवून त्यांना निवेदन दिले. चौकशीत बाजार समितीत अनियमितता आढळल्यास कारवाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.-आ. समाधान आवताडे

रितसर संचालक मंडळाचा ठराव करून कायदेशीरपणे नोटीस
शासकिय लेखापरिक्षक सो यांनी त्यांच्या लेखापरिक्षण अहवालात १० ते १५ वर्षापासून सरळ-सरळ व स्पष्टपणे लिहीलेले आहे की, आपल्या बाजार समितीचे शॉपींग सेंटर मधील गाळ्याचे भाडे हे नाममात्र आहे. ते आताच्या प्रचलित बाजार भावाप्रमाणे डिपॉझिट व भाडेवाड करण्यात यावे अन्यथा संचालक मंडळावरती कारवाई करण्यात येईल असे वेळो वेळी दोषदुरूस्ती अहवालात नमूद केलेले आहे.

मा. लेखापरिक्षक यांचे दोष दुरूस्ती अहवालातील त्रुटीची पूर्तता करणेसाठी भाडेवाढ करत असताना सर्व गाळे धारकांना समक्ष बोलावून तोंडी सूचना देवून त्यांना वेळ दिली होती त्यावेळी कोणत्याही गाळेधारकांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे मा. शासकिय लेखा परिक्षक सो यांच्या दोष दुरूस्ती अहवालाची पूर्तता करणेसाठी संचालक मंडळाला नाईलाजास्तव रितसर संचालक मंडळाचा ठराव करून कायदेशीरपणे नोटीस दिलेली आहे.

बाजार समीतीचे एकूण ७२ गाळे धारक आहेत. त्यापैकी फक्त आणी फक्त २२ च गाळे मालक हे स्वतः व्यवसाय करून गाळे चालवत होते. उर्वरीत ५० गाळेधारक यांनी पोट भाडेकरू ठेवून त्यांचेकडून १,००,०००/- रूपये डिपॉझीट व प्रतिमहीना ५,०००/- ते ६,०००/- रूपये भाडे वसुल करीत होते.
प्रत्यक्षात बाजार समितीला डिपॉझीट हे २०,०००/- रूपये व प्रतिमहीना भाडे १६००/- रूपये भरणा करीत होते व कुठलाही करार न करता हा सर्व प्रकार सुरू होता. पर्यायाने या सर्व बाबीमुळे बाजार समीतीचे नुकसान करून स्वतःचा ३०००/- ते ४०००/- रूपयांचा फायदा करून घेत होते.
मुळतः पोटभाडेकरून ठेवता येत नसतानाही बऱ्याच वर्षापासून ५० गाळे धारकांनी स्वतःच्या फायद्यासाठी पोटभाडेकरू ठेवून स्वतःचा फायदा करून घेवून पर्यायाने प्रत्यक्षरित्या बाजार समीतीचे नुकसानच केलेले आहे.
बाजार समितीने नोटीस दिले नंतर स्वतः गाळे धारकांनी डिपॉझिट व भाडेवाढ झालेने गाळा बाजार समीतीकडे जमा केलेला आहे. व त्यांचे डिपॉझिटचे रक्कम घेवून गाळा बाजार समितीकडे जमा केलेला आहे.
व बाजार समितीने गरजवंत व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यवसायीकांना १,००,०००/- रूपये डिपॉझिट व प्रतिमहिना ५,०००/- रूपये भाडे याप्रमाणे रितसर गाळे ताब्यात दिलेले आहेत.
सदरहू गाळे भाडेवाढ केलेने बाजार समिती ही ऑडिट वर्ग ब वर्गातून अ वर्गात आलेली आहे. व बाजार समितीस ४५,००,०००/- रूपये नफा झालेला असल्याचे सभापती सुशील आवताडे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज








