मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्य शासनाकडून मिळणाऱ्या कृषी औजारांसाठीच्या अर्जास पूर्वमंजुरीसाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेटे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

काल बुधवारी उत्तर सोलापूर तालुका येथील कार्यालयात सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात एकच खळबळ उडाली आहे.

यातील लोकसेवक धनंजय सुभाष शेटे (मूळ खेड, ता. कर्जत सध्या रा.गौरी गणेश नगर, बाळे) हे उत्तर सोलापूर तालुक्यात तालुका कृषी अधिकारी वर्ग-२ या पदावर कार्यरत आहेत.

त्यातील तक्रारदार यांनी आपले सरकार पोर्टलद्वारे महाडीबीटी पद्धतीद्वारे शेतीसाठी कृषी औजारे मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता.

त्याला पूर्वमंजुरी देण्यासाठी नमूद लोकसेवक शेटे यांनी तक्रारदारास २५ नोव्हेंबरला १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम ८ हजारांवर देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानुसार पडताळणी झाली.

काल बुधवारी कार्यालयीन वेळेत ठरलेल्या नियोजनानुसार तक्रारदार शेटे यांच्या कार्यालयात आले. त्यांनी आठ हजार रुपयांची रक्कम कागदामध्ये आणून समोरच्या टेबलावर ठेवली असताना आधीच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शेटे यांना पकडण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या अन्य पथकाने केली. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक शैलेश पवार, रवींद्र लांभाते, हवालदार सलीम मुल्ला, श्रीराम घुगे, स्वामीराव जाधव, राजू पवार, अक्षय श्रीराम यांचा समावेश होता.

लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल कार्यालयाशी संपर्क साधावा
भ्रष्टाचारासंदर्भात काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अॅन्टी करप्शन ब्युरो, रंगभवन सोलापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.- प्रशांत चौगुले, उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज
















