मंगळवेढा टाईम्स : संपादक – समाधान फुगारे (7588214814)
मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे, नगराध्यक्ष पदासाठी तिहेरी लढत होणार असल्याचे चिन्हे दिसत असून यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडून तेजस्विनी सुजित कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून तेजस्विनी कदम यांनी प्रचार देखील सुरू केला आहे. त्यांनी आपली सर्व यंत्रणा कामाला लावली असून भाजप कडून उभे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित जगताप यांच्या सुविद्य पत्नी सुप्रिया अजित जगताप यांनी देखील आज अर्ज दाखल करणार असल्याचे सोशल मीडियावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. अजित जगताप यांचा दांडगा अनुभव सुप्रिया जगताप यांच्या कामी येणार असल्याचे बोलले जात आहे.

तर समविचारी आघाडीकडून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष व मंगळवेढा तालुक्यातील जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्या सुविद्य पत्नी सुनंदा बबनराव आवताडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून त्यांनी प्रचार देखील सुरू केला आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष पदाबाबत कोणत्याच पक्षाने व कोणत्या नेत्याने अथवा स्थानिक आघाडीने अधिकृत उमेदवारी जाहीर केली नसली तरी देखील उमेदवारांनी आपल्या स्वतंत्र प्रचार यंत्रणा कार्यान्वित करून गल्लोगल्ली प्रचार सुरू केला आहे.

सोमवार दि.17 नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस असून पक्षाचा अधिकृत बी फॉर्म उमेदवारांना जोडावा लागणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोणाला बी फॉर्म देतोय हे पाहणे गरजेचे आहे.

मंगळवेढा नगरपालिकेचे चित्र जवळपास स्पष्ट होत असून तिहेरी लढत लागणार असल्याने आता प्रभागातील नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू असल्याचे बोलले जात आहे.

जर तिहेरी लढत लागली तर याचा फटका कोणाला बसणार व याचा फायदा कुणाला होणार? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










