टीम मंगळवेढा टाईम्स नेटवर्किंग।
मंगळवेढा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. शहरात एकूण २८ हजार ६३८ मतदार नोंदले असून,

यात पुरुष १४,२५१, महिला १४,३८५ आणि इतर २ मतदारांचा समावेश आहे. ही अंतिम यादी शुक्रवारी सायंकाळी उशिरा ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली.
दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक यादीत प्रभागनिहाय मोठा गोंधळ दिसून आला होता. अनेक मूळ रहिवाशांची नावे वगळली गेली होती,

तर काहींची नावे चुकीच्या प्रभागात दिसत होती. यावर नागरिकांनी आक्षेप नोंदविले होते. त्यापैकी २,०३९ हरकती तपासून दुरुस्त करण्यात आल्या.

शहरातील १० प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १० मध्ये सर्वाधिक ३,३७५ मतदार आणि प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वात कमी २,२९७ इतकी संख्या नोंदवण्यात आली आहे.

‘नागरिकांच्या हरकतींवर तत्काळ कार्यवाही करून तांत्रिक त्रुटी सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. असे मुख्याधिकारी योगेश डोके यांनी सांगितले.

आता आक्षेप तर कोर्टच पर्याय
अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याने आता कोणालाही हरकत असल्यास थेट न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार आहे.
निवडणुकीची उलटी गणना सुरू
राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता असून तयारीला वेग आला आहे. अंतिम यादी जाहीर होताच पक्ष व इच्छुक उमेदवारांनी प्रचारयंत्रणा सक्रिय केली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










