मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
2 नोव्हेंबर 2025 हा दिवस भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. 2025 च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी केली.
दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला 52 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवरील या विजयाने लाखो भारतीय चाहत्यांची स्वप्ने पूर्ण केली नाहीत तर भारतीय क्रिकेटसाठी एका नवीन युगाची सुरुवात केली.

विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या महिला संघावर आता पैशांचा वर्षाव सुरु झाला आहे. आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर आयसीसीकडून भारतीय महिला संघाला 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनेनूसार 40 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे.

दक्षिण अफ्रिकेवरही पैशांचा वर्षाव
उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेनेही स्पर्धेत अपवादात्मक कामगिरी केली. पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेलाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला उपविजेता म्हणून 2.24 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनेनूसार 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या संघाला किती रुपये मिळाले?
उपांत्य फेरीतील संघांना (ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड) 9.89 कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळाले. पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघांना 6.2 दशलक्ष, 7व्या आणि 8व्या स्थानावरील संघांना 2.47 दशलक्ष आणि सर्व सहभागी संघांना प्रत्येकी 2.2 दशलक्ष रुपये मिळाले. गट टप्प्यातील विजयांना प्रत्येक सामन्यासाठी 3.02 दशलक्ष रुपये बक्षिसे देण्यात आली.

बीसीसीआयकडूनही भारतीय महिला संघाला 51 कोटी रुपयांचं बक्षीस–
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी 51 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, महिला विश्वचषक 1973 मध्ये सुरू झाला होता.
परंतु भारतीय संघाला कधीही विश्वविजेतेपद मिळवता आले नव्हते. अखेर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने यापूर्वी 2005 आणि 2017 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र यंदा भारतीय महिला क्रिकेटपटूंनी दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत एक नवीन घडवला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














