मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी असंख्य शेतकऱ्यांसह बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन सुरु आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळलंय, शेतकरी कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळलं आहे.
त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीचे मोठं पॅकेज घोषित केलं खरं, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असा सूर उमटत आहे.

या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात नागपुरात 28 ऑक्टोबरपासून महामार्गावर असंख्य ट्रॅक्टर घेऊन शेतकरी आंदोलनासाठी एकवटले आहे. या आंदोलनात बच्चू कडू यांना राजू शेट्टी, अजित नवले आणि मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दर्शविला.

आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ यांनी बुधवारी रात्री उशिरा बच्चू कडू यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या मागण्या शिष्टमंडळांना सांगितला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना भेटीसाठी बोलवलं.

मुख्यमंत्री बैठकीनंतर काय म्हणालेत?
मुंबईत सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांसोबतच,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. त्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं असं म्हटलं जातंय.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी असणार आहे.

परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. बैठक सकारत्मक झाली आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळाले पाहिजे यावर भर दिला जाणार आहे. तसंच 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय घेण्यात येईल. शिवाय आम्ही कर्जमाफीच्या बाजूने असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.
तर येत्या 6 महिन्यात समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर शेतकरी कर्जमुक्तीसाठी समिती शिफारसी सुचविणार आहेत. अल्पकालीन व दीर्घकालीन शिफारशी सुचविण्याचे काम समिती करणार आहे. समितीत महसूल, वित्त, कृषी, सहकार आणि पणन या विभागांचे अपर मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबईचे अध्यक्ष तसंच बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी या समितीत सहभागी असणार आहे.

आम्हाला कर्जमाफीची तारीख मिळाली – कडू
बैठक झाल्यानंतर बच्चू कडू सह्याद्री निवासस्थानावरून बाहेर आल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, बैठक सकारात्मक झाली असून आम्हाला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात तारीख हवी होती.
त्याबद्दल राज्य सरकारने आम्हाला तशी तारीख दिली आहे. 30 जून 2026 पर्यंत समिती आपला निर्णय देईल. त्यानंतर शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात येईल, असं बच्चू कडू यावेळी म्हणालेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











