मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
आयसीसी विमेंस वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी सेमीफायनल रंगली होती. या सामन्यात अखेर भारताने ऑस्ट्रेलियाच्या टीमचा पराभव करत इतिहास रचला आहे.
या विजयासह टीम इंडियाच्या मुलींना फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनल सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

३३९ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. प्रतीका रावलच्या दुखापतीनंतर टीममध्ये परतलेली शेफाली वर्मा फक्त १० धावांवर बाद झाली.
त्यानंतर १०व्या ओव्हरमध्ये स्मृती मंधानाही २४ रन्सवर माघारी परतली. पण या कठीण परिस्थितीत कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी डाव सावरला.

हरमनप्रीत आणि जेमिमा या दोघींनी जबरदस्त पार्टनरशिप करत १८व्या ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर शंभराच्या पुढे नेला. या जोडीने १६७ रन्सची शतकी भागीदारी केली. मात्र ३६व्या ओव्हरमध्ये हरमनप्रीत ८९ रन्सवर बाद झाली आणि भारताला तिसरा धक्का बसला.

यानंतर दीप्ती शर्मानेही चांगली खेळी केली. पण ४१व्या ओव्हरमध्ये ती २४ धावांवर रनआऊट झाली. दुसऱ्या टोकाला मात्र जेमिमा ठामपणे उभी राहिली. तिने ११५ चेंडूत शानदार शतक ठोकलं आणि भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. अखेरीस तिने अमनज्योत सोबत भारताला विजय मिळवून दिला.

जेमिमा आणि हरमनप्रीतला रडू कोसळलं
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३९ रन्सचं भारताला आव्हान दिलं होतं. यावेळी टीम इंडियासाठी हे खूप कठीण आव्हान होतं. मात्र टीम इंडियाच्या मुलींनी हे आव्हान पूर्ण करत इतिहास रचला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा यांना रडू कोसळलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

फायनलमध्ये आता दक्षिण आफ्रिकेशी होणार लढत
या विजयासह आता निश्चित झालंय की, २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर अंतिम सामन्यात जगाला नवा महिला विश्वविजेता मिळणार आहे. कारण भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही टीम्सने आजवर एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही.

रेकॉर्डब्रेकिंग धावांचा पाठलाग
भारताने केलेला 341/5 रन्सचा स्कोअर हा महिला वनडे क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्कोअर आहे. विशेष म्हणजे, याआधी गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये याच ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध भारत 369 रन्सवर ऑलआऊट झाला होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















