मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
देशभरातील जवळपास ८ हजार शाळांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही, असे शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

या ‘शून्य प्रवेश’ असलेल्या शाळांमध्ये तब्बल २०,८१७ शिक्षक कार्यरत आहेत, म्हणजेच एवढे शिक्षक फुकटचा पगार घेत आहेत. तरी यंदा शून्य प्रवेश शाळांमध्ये ५ हजारांनी घट झाली आहे.

‘एक शिक्षक शाळां’मध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर : तथापि, विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दृष्टीने ‘एक शिक्षक शाळां’मध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर असून त्यापाठोपाठ झारखंड, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश आहेत.

अशा शाळांची एकूण संख्या २०२२-२३ मधील १,१८,१९० वरून २०२३-२४ मध्ये घटून १,१०,९७१ झाली असून, सुमारे सहा टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

सर्वाधिक ‘शून्य प्रवेश’ शाळा पश्चिम बंगालमध्ये
‘शून्य प्रवेश’ असलेल्या सर्वाधिक ३,८१२ शाळा पश्चिम बंगालमधील असून तेथे १७,९६५ शिक्षक रिकामे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर तेलंगणा असून तिथे २,२४५ रिकाम्या शाळांमध्ये १,०१६ शिक्षक कार्यरत आहेत.

मध्य प्रदेशात ४६३ शाळा व २२३ 3 शिक्षक आहेत. शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील ‘शून्य प्रवेश’ शाळांची संख्या गेल्या वर्षीच्या १२,९५४ वरून कमी होऊन यंदा ७,९९३ वर आली आहे.

एकच शिक्षक असलेल्या एक लाख शाळा
उत्तर प्रदेशात ‘शून्य प्रवेश’ ८१ शाळा आहेत. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने सलग तीन वर्षे विद्यार्थ्यांचा प्रवेश न झालेल्या शाळांची मान्यता रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे

देशभरात १ लाखाहून अधिक ‘एक शिक्षक असलेल्या शाळा’ कार्यरत आहेत, ज्यात ३३ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये आंध प्रदेशात अशा शाळांची संख्या सर्वाधिक असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक व लक्षद्वीप या राज्यांचा क्रम लागतो.
या राज्यांत नाहीत शून्य प्रवेश शाळा: दरम्यान, हरयाणा, महाराष्ट्र, गोवा, आसाम, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये ‘शून्य प्रवेश’ एकही शाळा नाही. केंद्रशासित प्रदेशांपैकी पुदुच्चेरी, लक्षद्वीप, दादरा आणि नगरहवेली, अंदमान-निकोबार बेटे, दमण-दीव आणि चंडीगड येथेही एकही शून्य प्रवेश असलेली शाळा नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











