मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मराठा आरक्षणासाठी मुंबई जाम करणाऱ्या मनोज जरांगे आता शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मैदानात उतरणार आहेत..

त्यासाठी मनोज जरांगेंनी 2 नोव्हेंबरला राज्यातील सगळ्याच शेतकरी संघटना आणि अभ्यासकांना आंतरवली सराटीतील बैठकीसाठी साद घातलीय…कधी शेतीसंदर्भातील सरकारची धरसोडीची धोरणं,तर कधी दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीला आलाय..

हे कमी होतं की काय, यंदा अतिवृष्टीने राज्यात 70 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालंय.. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय..

याच उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला कर्जमुक्त कऱण्यासाठी आधी बच्चू कडूंनी आंदोलनाची हाक दिलीय.. तर आता बच्चू कडूंपाठोपाठ जरांगेंनीही सगळ्या शेतकरी संघटनांना साद घातलीय..

दुसरीकडे आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी 2023 पासून सातत्याने नाकेबंदी करणाऱ्या मनोज जरांगेंनी हैदराबाद गॅझेटियरचा जीआर मिळवलाय.. मात्र त्यासाठी जरांगेंना 7 वेळा आंदोलन करावं लागलंय..

आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली असली तरी सरकार जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेऊन पिकांच्या हमीभावासोबतच कर्जमाफीची मागणी मान्य होणार की आतापर्यंतच्या शेतकरी आंदोलनाप्रमाणे हे आंदोलनंही दडपलं जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय…

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











