टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरचा बॉयलर पूजन व १२ वा गळीत हंगाम श्री.स.स. बाळासाहेब महाराज (मठाधिपती- श्री बाळकृष्ण माऊली मंदिर नंदेश्वर) यांच्या शुभ हस्ते बॉयलर पूजन शुभारंभ करण्यात आला.
व भैरवनाथ उद्योग समुहाचे चेअरमन अनिलदादा सावंत, व्हा.चेअरमन केशव सावंत व रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा शेटजी यांच्या व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी सत्यनारायण पुजा श्रीपती माने सरकार त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.चंद्रप्रभा व देवानंद पासले त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रिती यांच्या शुभ हस्ते बॉयलरची व सत्यनारायणची पुजा करण्यात आली.
कार्यक्रमाचे वेळी चेअरमन अनिलदादा सावंत म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाठीमागील ११ गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहेत.
आजपर्यंत ज्या विश्वासार्हतेवर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केले आहेत त्याच विश्वासावर चालू गळीत हंगाम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यासाठी लागणारी सर्व ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले. कारखान्याचे संस्थापक माजी आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट दिलेले आहे ते आम्ही पूर्ण करू असे आश्वासन चेअरमन अनिलदादा सावंत यांनी यावेळी दिले. यावेळी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, श्री संत दामाजी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन तानाजी खरात, संचालक बसवराज पाटील, राष्ट्रवादी शहर प्रमुख चंद्रशेखर कोंडुभैरी, मुजफ्फर काझी, सचिन नकाते, माऊली काळे, सुधीर भोसले, राजकुमार पाटील, तुकाराम भोजने, भीमराव मोरे, संतोष रंधवे, साहेबराव पवार,
अनिल पाटील, दादासाहेब पवार, शिवशंकर कवचाळे, संगीताताई कट्टे स्मिताताई अवघडे, जमीर इमानदार व श्रीपती माने सरकार, रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर, तानाजी चव्हाण,
समाधान जाधव, शाम गोगाव, नितीन पवार ,लक्ष्मण पवार ,सिताराम भगरे, संगीता पुरमे व भैरवनाथ शुगरचे जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, मुख्यशेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे,
चीफ अकौंटंट देवानंद पासले, एच आर मॅनेजर संजय राठोड, ई.डी.पी मॅनेजर गजानन माने-देशमुख, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, स्टोअर किपर केदार साबणे, इलेक्ट्रिक इंजिनीअर संतोष माळी,
सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, कार्यालय अधिक्षक अभिजीत पवार व कर्मचारी वृंद यांच्यासह परिसरातील सरपंच,मान्यवर,पत्रकार बांधव व ऊस उत्पादक शेतकरी आणि तोडणी-वाहतूक ठेकेदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज