मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीनंतर तालुक्याचे लक्ष लागलेल्या पंचायत समितीच्या सभापतीच्या आरक्षण सोडतीत पुन्हा एकदा सर्वसाधारण महिलेला संधी मिळाल्यामुळे पंचायत समितीबरोबर तालुक्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा महिलाराज येणार आहे.
पंचायत निवडणुकीत पंचायत समितीच्या आठपैकी पाच जागा आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने जिंकल्या होत्या. त्यामध्ये ओबीसीतून प्रदीप खांडेकर व सर्वसाधारण जागेवर प्रेरणा मासाळ यांनी सभापतिपद भूषविले.
त्यानंतर तब्बल तीन ते चार वर्षे पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे पंचायत समितीचा कारभार प्रशासकाच्या हाती होता.
नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेला नगराध्यक्ष होण्याची संधी मिळणार असल्यामुळे तालुक्याचे लक्ष पंचायत समितीच्या सभापती पदाच्या सोडतीकडे लागले होते.
सर्वसाधारण महिलेला संधी मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता सर्वच राजकीय नेत्यांना सर्वसाधारण प्रवर्गातून राजकीय बलस्थानाबरोबर तालुक्यातील प्रश्नांची जाण असलेल्या महिलेचा शोध घ्यावा लागणार आहे.
महिला सुरुवातीला कोण इच्छुक नाही अशी शक्यता असतानाच डझनभराहून अधिक महिला आता नगराध्यक्षपदासाठी इच्छुक झाल्या. अगदी तीच परिस्थिती पंचायत समितीमध्ये राहणार आहे.
सध्या पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचे वर्चस्व होते. त्यावेळी ते कोणत्याही पक्षाशी संबंधित नव्हते आता सध्या भाजपचे आमदार लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना आता भाजपचा सभापती करण्याचे आव्हान आहे.
मात्र त्यांच्या विरोधात तालुक्यात विधानसभेला तब्बल एक लाख १७ हजार मते घेतलेले भगीरथ भालके सक्रिय झाले. समविचारी आघाडीची भूमिका देखील निर्णायक राहणार आहे.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज