मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून दोन लाख रुपयांचा लाभ घेऊन कामगार कार्यालयाची फसवणूक केल्याच्या १७ प्रकरणांमध्ये बनावटगिरी आढळून आल्याचे समोर येताच
८ जणांविरोधात सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी दिली.
सोलापुरातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने लाभार्थीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. वाढत्या तक्रारीच्या अनुषंगाने कामगार कार्यालयाने मयत व्यक्तींच्या वारसांना दोन लाखांची मदत दिली जाते.
मृत्यू प्रमाणापत्राबरोबरच आणखी कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक असते. मात्र, काही लाभार्थीनी बनावट मृत्यू प्रमाणपत्र जोडून लाभ घेतल्याची माहिती पडताळणीनंतर समोर आली आहे. सहायक कामगार आयुक्तांनी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
बोगसगिरी आढळून आल्यावर गुन्हे दाखल केले
बांधकाम कामगारांच्या बोगसगिरीला चाप लावण्यासाठी आम्ही गोपनीय पद्धतीने बोगस लाभार्थी शोध मोहीम सुरू केली आहे.
सुरुवातीला मयत वारसदारांना देण्यात येत असलेल्या लाभाच्या प्रस्तावांची पडताळणी करून तपासणी केली. मृत्यू प्रमाणपत्रे खरे की खोटे हे तपासले. बोगसगिरी आढळून आल्यावर गुन्हे दाखल केले. ही मोहीम पुढेही कायम सुरू राहणार आहे.- निलेश येलगुंडे, सहायक कामगार आयुक्त
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज