टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्यातील ज्ञानेश्वरी गडदे हिच्यावर सासरच्या मंडळींनी केलेल्या अमानुष छळामुळे तिचा बळी गेला.
या प्रकरणात मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच दिवस उलटून गेले तरीही मुख्य आरोपींना अटक न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पीडित कुटुंबाचा थेट आरोप आहे की, आरोपींना प्रचंड आर्थिक व राजकीय पाठबळ असल्यामुळे पोलीस मुद्दाम उडवा-उडवी करत आहेत. आरोपी शोभा शिवाजी गडदे, समाधान शिवाजी गडदे व शिवाजी काशिनाथ गडदे हे अजूनही उघडपणे फिरत आहेत.

“पोलिस आरोपींच्या खिशात आहेत, त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही. आमच्या मुलीला निर्दयीपणे छळून संपवले, तरीही आरोपी मोकाट आहेत.

जर तातडीने अटक झाली नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याला जबाबदार मंगळवेढा पोलीस स्टेशनच असेल,” असा तीव्र इशारा ज्ञानेश्वरीच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

या गंभीर प्रकरणात सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने हस्तक्षेप करून आरोपींना अटक करावी, अन्यथा याचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा कुटुंबीय व नागरिकांनी दिला आहे.

माझ्या मुलीला कोणी न्याय देता का न्याय .
न्याय पाहिजे हो. कोणी न्याय देईल का?
गरीबाच्या घरी जन्माला येणे गुन्हा आहे का आम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे. आमच्या ज्ञानेश्वरी( पायल )वरतीअन्याय झाला आहे. मंगळवेढा पोलिस टेशनमध्ये फिर्याद देवुन सुद्धा पोलिसांनी मुख्य आरोपींना अजुन अटक केली नाही आजचा पाचवा दिवस आहे.

तरीही आरोपींना अजून अटक केली नाही मुलीच्या सासरच्या लोकांनी आमच्या मुलीवर भरपूर अत्याचार केला आहे . ते म्हणतात की आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही पोलिस आणि सरकार आमच्या खिशात आहेत.
आम्ही पोलीसांना विचारले की आम्हाला सांगतात की तपास चालू आहे. पोलीस कार्यवाहीसाठी विलंब करत आहेत. मुख्य आरोपी शोभा शिवाजी गडदे, समाधान शिवाजी गडदे, शिवाजी काशिनाथ गडदे हे आरोपी खुल्याआम फिरतात आमचे कोणीच काही करू शकता नाही असे म्हणतात ….या आपल्या देशात संविधान आहे

न्यायदेवता पैशापुढे आदळी झाली आहे देशात आशाच न्याय भेटतो का ? असा न्याय भेटत असेल तर आमच्या सारख्या गरीबांनी कोण्याकडे न्याय मागयच्या? आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे न्याय मिळाला पाहिजे अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









