टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती स्व.भगवान भाकरे यांच्या २३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता कै.भगवानराव भाकरे शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्था आंधळगाव येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती दामाजी शुगरचे माजी संचालक पांडुरंग भाकरे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना गौरविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दामाजी शुगरचे माजी संचालक बाळकृष्ण सुडके, आंधळगाव व पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, विविध पदांवर नुकतेच रुजू झालेले मानकरी
तसेच शालेय शिक्षणात विशेष प्राविण्य मिळविणारे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तरी आंधळगाव व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन हिम्मतराव भाकरे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज