मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. मनोज जरांगे आता मुंबईत पोहोचले असून त्यांनी आझाद मैदानात आपले आमरण उपोषणाचे आंदोलन चालू केले आहे.
काहीही झालं तरी आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय येथून जाणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत.
एकीकडे मुंबईत पाऊस चालू झाला आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक आझाद मैदानात ठाण मांडून आहेत.
दरम्यान एकीकडे मुंबईत मराठा आंदोलन चालू असताना दुसरीकडे कायदा व सुव्यस्था कायम राखली जावी म्हणून जरांगे यांनी मोठा आदेश दिला आहे. त्यांनी सीएसटीवरील मराठा आंदोलकांचा उल्लेख करून हा आदेश दिला आहे.
फक्त 25 ते 30 माकडं आहेत, पण…
सीएसटीवर तसे पंचवीस ते तीस जण माकडं आहेत. त्यांच्यामुळे आपले लोक तिकडं अठरा किलोमीटरवर लोकं थांबले आहेत. इथं आंदोलनला दोन टक्केसुद्धा लोकं आलेले नाहीत. 98 टक्के लोक अजूनही मुंबईच्या बाहेर थांबलेले आहेत. त्या भंगार पोरांना शांता राहा असे सांगायला सरपंच सीएसटीवर गेले होते.
मात्र ते पोरं सरंपंचांनाच उलटे बोलायला लागले आहेत. म्हणजेच ते मुलं आपल्यातले नाहीत. कारण सरपंच महाराष्ट्रातील जवळपास सर्वच आंदोलकांना ओळखतात. आपल्याला फिरून बोलत आहेत म्हणजे ते आंदोलनातले नाहीत, असे जरांगे संतापून म्हणाले. तसेच मी तुम्हाला गोडीत आरक्षण देतो, असे सांगत त्यांनी मराठा आंदोलकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले.
जाम झालेली मुंबई मोकळी करा
सीएसएमटी स्थानकावरील मुलं कोणाच्या ओळखीचे आहे. सरकार आपल्याला सहकार्य करत आहे. मला उपोषणामुळे उद्यापासून बोलता येणार नाही. मला पुन्हा कोणाचा फोन येऊ देऊ नका.
सरकार आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपण मुंबई जाम करणार असे बोललो होतो. आता सरकार सहकार्य करत आहे. त्यामुळे आता मुंबई जी जाम झाली आहे ती मोकळी करणे गरजेचे आहे, असे आवाहनही जरांगे यांनी आंदोलकांना केले.
सीएसटी स्थानकावर नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार सध्या मुंबईत जोरदार पाऊस चालू आहे. पाऊस चालू झाला तेव्हा काही मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकाच्या परिसरात होते. त्यामुळे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून काही आंदोलक हे सीएसएमटी स्थानकात गेले. हळूहळू येथील गर्दी वाढत गेली.
गर्दी वाढल्यानंतर काही आंदोलकांनी या भागात पाटील-पाटील नावाच्या घोषणा दिल्या. तसेच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थही त्यांनी घोषणाबाजी केली.
त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागू नये, म्हणून सीएसटी स्थानकावरील परिस्थितीची माहिती लगेच जरांगे यांना देण्यात आली. तसेच जरांगे यांनीदेखील लगेच उपोषणस्थळावरूनच हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना थांबवण्याच्या सूचना केल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज