मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर दाखल होत उपोषणाला सुरूवात केली. उपोषण सुरू करताना त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन केले.
‘सरकारने सहकार्य केले आणि आपणही त्यांना सहकार्य करू. कुणीही जाळपोळ आणि दगडफेक करायची नाही. पोलिस बांधवांना सहकार्य करा.’, असे सांगत मनोज जरांगे यांनी सर्वांना संयम ठेवण्यास सांगितला आहे. मागणी मान्य होईपर्यंत मुंबई सोडायची नाही, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी सांगितले की, ‘आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलोय. गडबड गोंधळ करू नका.
आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्याला ७० वर्षे काही मिळाले नाही. आपला समजात कसा मोठा करता येईल, त्यासाठी आपल्याला पर्यत्न करायचे आहेत.’
सरकारने सहकार्य केल्याबद्दल जरांगेंनी आभार मानत सांगितेले की, ‘आपलं मुंबईत यायचे ठरलं होतं. आझाद मैदानात उपोषण करायचं हे ठरलं होतं. त्याप्रमाणे आपण इथे आलोय. आपलं उपोषण सुरू आहे.
आता तुमची काय जबाबदारी आहे. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हते म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि मुंबई जाम करणार होते आणि मुंबई जाम केली पण. आता सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे परवानगी दिली. त्याबद्दल आपण सरकारचे कौतुकही केले.
जरांगेनी मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन करत सांगितले की, ‘कुणी जाळपोळ दडगफेक करायची नाही. सोमवारी-मंगळवारी महाराष्ट्राने सहकार्य नाही केले तर मुंबईमध्ये पुन्हा यायचे. आरक्षणाची जबाबदारी माझ्याकडे, शांततेत राहून सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची.
आपल्या रस्त्यावरील गाड्या काढायच्या आहे पार्किंगमध्ये पोलिस सांगतील तिथे लावायची. स्वत: तुम्ही स्वंयसेवक म्हणून काम करायचे. दोन तासांत मुंबई रिकामी झाली पाहिजे. उपोषणाला बसल्यानंतर मला बोलता येणार नाही.
पोलिस नाराज झाले नाही पाहिजे, वाहतूक कोंडी झाली हे ऐकायला आलं नाही पाहिजे. आपण आझाद मैदानात यायचे होते आलो. समाजाची मान खाली जाईल असे वागू नका.’
आरक्षण घेतल्याशिवाय इथून हालणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. ते म्हणाले की, ‘डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचे नाही. मराठ्यांची मान खाली जाईल, असे कुणीही वागायचे नाही.
कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. समाजाला कुटुंब मानलेय. मी तुमच्या कुटुंबातील आहे, तर माझा शब्द खाली पडू देऊ नका. मी कुटुंबासाठी लढतोय.
माझ्या कुटुंबाची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण समाज उभा राहिला पाहिजे. जे मैदान दिलेय, तिथेच राहायचे अन् झोपायचे. मी आझाद मैदानावर आहे, म्हटल्यावर तुम्ही घरात निवांत झोपा.’
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज