टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील विठाई परिवार महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी या बँकेच्या दुसरा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार असून बँक आज तिसऱ्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण करत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष स्वप्निल काळुंगे यांनी दिली.
विठाई परिवार महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी या बँकेचा मंगळवेढा शाखेचा दुसरा वर्धापनदिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल काळुंगे यांनी सहकारातून समृद्धीकडे हा दृष्टिकोन ठेऊन ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठी सोयी उपलब्ध करून दिली आहे. विठाई परिवार महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी बँकेमुळे तालुक्याचा कायापालट होण्यास मदत होत आहे.
आज मंगळवेढा शाखा तिसऱ्या वर्षात पदार्पण करत असून परिसरातील नागरिकांनी बँकेच्या कामकाजावर विश्वास ठेवून कोट्यवधी ठेवी ठेवल्या आहेत.
आज सत्यनारायण पूजा व अल्पपोहार कार्यक्रम आयोजित आहे. तरी सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व परिसरातील सर्व मंडळी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन काजल स्वप्निल काळुंगे यांनी केले आहे.
विठाई परिवार महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जात आहे.
बँकेची 100 टक्के वसुली
विठाई परिवार महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी बँकेची 2024-25 वर्षात 100 टक्के वसुली झाली असून लेखापरीक्षक यांनी बँकेला ‘अ’ वर्गाला दर्जा दिला आहे. बँकेचा NPA “0” टक्के आहे
दामदुप्पट योजना
विठाई परिवार महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी बँकेची 6.5 वर्षात दामदुप्पट करून मिळणार आहे.
वार्षिक 10 टक्के व्याजदर
नागरिकांना ठेवींवर 10 टक्के व्याज दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वांना या योजनेचा भरपुर फायदा देखील मिळणार आहे.
सोनेतारण कर्ज 80 हजार प्रति तोळा
अगदी कमीत कमी वेळेत नागरिकांना प्रती तोळा तब्बल 80 हजार रुपये दिले जाणार आहेत. ही विठाई परिवार महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी बँकेची वैशिष्ट्य आहे.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे.
कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा , ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा,व्यावसायिक कर्ज सुविधा, प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायं ६
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज