मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राज्यातील सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करा..व्यवसाय बंद ठेवा..नोकरदार यांनी काम बंद करा…मुंबईकडे निघा….जगाच्या पाठीवर या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
संपूर्ण महाराष्ट्र उद्या 27 ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील समर्थकांसह
जालन्याच्या अंतरवालीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत.
दि.29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल मनोज जरांगे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसेच यावेळी नेमक्या कोणत्या मागण्या आहेत?, सरकारकडून नेमक्या अपेक्षा काय?, याबाबतची माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार?
– अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार…
– अंतरवाली – पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)
– 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर…28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.
– 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार…
मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
कुणबी आणि मराठा एकच आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेट लागू करा अशी त्यांनी मागणी केली. गेल्या 13 महिन्यांपासून अभ्यास सुरू आहे. आम्हाला सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावं. सरकारने मराठ्यांचा विषय समजून घेतला पाहिजे. दीडशे वर्षांपूर्वी आमच्या नोंदी आहेत, पण सग्यासोयऱ्यांचा आदेश काढून दीड वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
मराठा अजूनही संयमी आहे, त्याची व्याख्या देण्यात आली आहे. ज्यांची कुणबी नोंद आहे त्या सगेसोयरे दाखले द्या, आता आंदोलन खूप पुढे गेला असून राज्य अस्थिर करू नका, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. मला आंदोलन शांततेत पाहिजे. कोणी जाळपोळ दगडफेक करायची नाही, अशा सूचनाही मनोज जरांगेंनी दिल्या.
आपल्या शेजारी जाळपोळ झाली तरी आपण पुढे चालायचं, असं मनोज जरांगे म्हणाले. आजच्या दिवस प्रेमाने सांगतो…आम्हाला मुंबईला जायचं नाही. तुम्ही आरक्षण दिल्यावर, आम्हाला मुंबईला जायची गरज नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज