मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता फास्टॅग पास सुरु झाला आहे. आता तुम्हाला वर्षाला फक्त ३००० रुपयांचा फास्टॅग पास काढायचा आहे. यामुळे तुम्हाला वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे.

टोल प्लाझावर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. आजपासून हा फास्टॅग पास सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता या पासमुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूरकरांना फायदा होणार आहे.

या तिन्ही जिल्ह्यांना फायदा होणार आहे
हा फास्टॅग पास तुम्ही सरसकट सर्व टोल प्लाझावर वापरु शकत नाही. तुम्हाला फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर पास वापरता येणार आहे. दरम्यान, या निर्णयाचा फायदा कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील लोकांना होणार आहे.

या मार्गातील टोल प्लाझावर तुम्हाला टोल भरावा लागणार नाहीये. असं जरी असले तरीही या पासचा फायदा पर्यटनासाठी किंवा कामासाठी बाहेर जाणाऱ्यांना विशेष फायदा होणार आहे.असे जरी असले तरीही वर्षभरात २०० फेऱ्या होणार नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

किंमत किती आणि कुठे उपलब्ध होणार पास?
वार्षिक फास्टॅग पासची किंमत ३००० रुपये असणार आहे. तुम्ही ज्या तारखेपासून हा फास्टॅग पास खरेदी करणार त्यानंतर वर्षभर वापरता येणार आहे किंवा २०० ट्रीपसाठी वापरता येणार आहे.
जी खाजगी वाहने सुट्टी किंवा सणांच्या कालावधीत परजिल्हा, परराज्यात जातात त्यांना हा पास लागू होणार नाही. हा पास कार, जीप, व्हॅन या वाहनांना वापरता येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














