mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रवादी आक्रमक,पडळकर यांच्या विरोधात मंगळवेढ्यात आंदोलन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
राष्ट्रवादी आक्रमक,पडळकर यांच्या विरोधात मंगळवेढ्यात आंदोलन

सुरज फुगारे । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिका केली होती. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. यानंतर संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु केली आहेत. मंगळवेढा येथे   पडळकरांचा निषेध करण्यात आला. यावेळी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  Agitations on mangalwedha against NCP aggressor, Padalkar

-हे नक्की वाचा

मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर येणार प्रशासक ; निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता 

सोलापुरात कोरोनाबाधितांचे मृत्यू थांबेनात ; बुधवारी 6 बळी तर 25 नव्या रुग्णांची भर 

सोलापूरात कडक संचारबंदी करण्याचा प्रस्ताव ; निर्णय आज जाहीर होणार 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पडळकर मुर्दाबाद शरद पवार जिंदाबाद अशा घोषणाही यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शहर व तालुका, काँग्रेस शहर व तालुका यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना झालेल्या घटनेचे निषेधार्थ आमदार गोपीचंद पडळकर यांचे विरूध्द योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी व यापुढील काळात गैर कृत्य केलेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केला जाईल या आशयाचे निवेदन देण्यात आले.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधत शरद पवार हे महाराष्‍ट्राला लागलेला कोरोना असल्याचे म्हटले होते. तसेच, शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचाही आरोपही पडळकर यांनी केला होता.

त्याचबरोबर मुंबई हे हॉटस्पॉट आहे, आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येऊ नये, अशी मागणीदेखील पडळकर यांनी केली होती. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंढरपुरात प्रवेश बंदी आहे. चातुर्मासासाठी पंढरपुरात आलेल्या महाराजांना पंढरपूरमध्ये राहण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. अशातच आषाढी एकादशी महापूजेसाठी जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असतील तर ते योग्य नाही, असेही ते म्हणाले होते.

यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे समाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष विजय खवतोडे,शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुजम्मील काझी,शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम कुदळे,शहराध्यक्ष सुनील दत्तू शिवसेना,शहर समन्वक नारायण गोवे, नगरपरिषद मंगळवेढा आरोग्य सभापती प्रविण खवतोडे,नगरसेवक राहूल सावजी, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष नजीर इनामदार, जमीर इनामदार, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष प्रज्वल शिंदे,शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सोमनाथ बुरजे,माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रफुलता स्वामी, सुनीता गाडे,महानंदा धुमाळे,सजाबाई पावले, कुसुम पाटील यांचेसह विक्रम शेंबडे ,हर्षद डोरले, गणेश धोत्रे,शैलेश गोवे,पिंटू गवळी, जावेद सुतार ,अजय आसबे आदीजन उपस्थित होते.

—————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshMaharashtra MazaMangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापुरात संचारबंदीचा निर्णय तूर्त नाही ; मात्र ‘हा’ नियम पाळावे लागणार

सोलापुरात संचारबंदीचा निर्णय तूर्त नाही ; मात्र 'हा' नियम पाळावे लागणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा