मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता बोगस ग्रामसभा दाखवून गावात बियर बारला नाहरकत प्रमाणपत्र देणाऱ्या मोहोळ तालुक्यातील येणकी ग्रामपंचायतचे
सरपंच पोपट केशव जाधव यांना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी थेट सरपंच व सदस्यपद रद्द केले. तसे आदेश ५ ऑगस्ट रोजी काढले.
विभागीय आयुक्तांनी येणकी येथील सरपंचांना घरी बसवल्याने मोहोळ तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, येणकी गावचे उपसरपंच आकाश खरात यांनी याबाबत तक्रार केली होती.
माजी सरपंच हरिभाऊ घुले यांनी ही हे प्रकरण लावून धरले होते. सदर प्रकरणात यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ग्रामसेवक एन. व्ही. काशीद यांना निलंबित केले आहे.
दि. ११ एप्रिल २०२२ रोजी सरपंच पोपट जाधव व ग्रामसेवक काशीद यांनी संगणमताने बोगस ग्रामसभा दाखवून गावाच्या हद्दीत राजरत्न बियर बारसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते.
त्या विरोधात उपसरपंच खरात यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. सरपंच पोपट जाधव यांच्याविरुद्धचे प्रकरण विभागीय आयुक्त यांच्यासमोर चालून त्यांनी ५ ऑगस्ट रोजी या प्रकरणात निकाल दिला.
यापूर्वी याच प्रकरणात ग्रामसेवकही निलंबित
या प्रकरणात ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव, ग्रामसभा अजेंडा, ग्रामसभा उपस्थिती पत्रक, ग्रामसभा दवंडी रजिस्टर हे प्रत्येक वर्षी नवीन तयार करणे,
ग्रामसभेबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण करावे, असे निर्देश असताना ११ एप्रिल २०२२ रोजीच्या ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण न करणे,
शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असल्याचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवक काशीद यांना निलंबन केले होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज