टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे ते मुंढेवाडी मार्गावरील कॅनॉलवर सांगोला येथील एका ४६ वर्षीय ज्वेलर्स व्यवसायिकाला बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून १० लाख रुपये घेवून बनावट सोने देवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी
अमित भोसले, सुरज भोसले, संदिप भोसले, रवी काळे, रणजित (रा. जत), तेजस शिर्के (रा. सांगोला) या सहा जणांविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी गणेश भजनदास शिंदे (वय ४६, रा. कडलास रोड, सांगोला) हे ज्वेलर्स व्यवसायिक असून दि.९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० वा.
बोराळे ते मुंढेवाडी मार्गावरील कॅनॉलवर वरील आरोपींनी फिर्यादीस बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून रोख रक्कम १० लाख रुपये घेवून त्या बदल्यात बनावट सोने देवून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली
असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून दि.२६ जुलै रोजी २.५६ वा. मंगळवेढा पोलिसात गुन्हा सदर आरोपीविरूध्द दाखल झाला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज