मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथील नामदेव पितांबर लोखंडे यांच्या घरातील चोरीचा उलगडा करण्यात सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे व त्यांच्या पथकाला यश आले असून
१ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी दिनेश लोखंडे यास अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, फिर्यादी नामदेव पितांबर लोखंडे (वय ५५ वर्षे, रा.उचेठाण, ता.मंगळवेढा) हे दि.२६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आदमापूर येथे बाळूमामाचे दर्शनासाठी घरातून गेले होते.
त्यानंतर दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादीची पत्नी लतिका शाळेवर गेल्या होत्या. सायंकाळी घरी आल्यानंतर कुलूप उघडे होते. त्यानंतर रात्री १० चे सुमारास फिर्यादी घरी आले.
दि.२८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता माचणूर यात्रेत जाण्यासाठी कपाटात ठेवलेले पैसे घेण्यास गेले असताकपाटात ठेवलेले ९० हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस,
२५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पिळ्याची अंगठी, १२ हजार रुपये रोख रक्कमअसा १ लाख २७हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसले.
पुतण्यानेच घरात चोरी केली
आरोपी पुतण्या दिनेश हा गुन्हा घडला त्या दिवशी त्यांच्या घरात आला होता. त्याचे वर्तन संशयास्पद होते. तसेच तो लतिका यांना गुन्हा दाखल करण्यापासून परावृत्त करत होता.
गुन्हा केल्यापासून तो उचेठाण गावातून निघून गेला होता. दि. १७ जुलै रोजी मंगळवेढा परिसरातून ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबुल केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज