टीम मंगळवेढा टाईम्स न्युज ।
चोरी करण्यासाठी चोरटे वेगवेगळी शक्कल लढवत असतात. रात्री दरोडा टाकण्यासोबत दिवसा रोडवर जाणाऱ्या महिला, वृद्ध यांना टार्गेट करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
मात्र मंगळवेढा तालुक्यात चोरट्यांनी चोरी करण्याचा नवा फंडा सुरू केला आहे. एखाद्या व्यक्तीला गाठत पोलीस असल्याची बतावणी हे चोरटे करतात. यानंतर संधी मिळताच दागिने घेऊन पसार होत असल्याचे प्रकार घडले आहेत.
पोलिस असल्याची बतावणी करुन भामट्यांनी महिलेकडील सोन्याच्या पाटल्या पाच लाख रुपये किमतीचा ऐवज लांबवला आहे. रविवार दि.२० जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास
सोलापुरकडे जाणारे बायपास रोडवरुन बनशंकरी कॉलनीकडे जाणा-या रोडवर मंगळवेढा येथे प्रकार घडला. याबाबत मंगल सिताराम गायकवाड (वय 59, रा.चैतन्य कॉलणी धर्मगाव रोड दामाजी नगर) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे
पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल दि.20 जुलै रोजी 5.30 च्या सुमारास फिर्यादी व फिर्यादीच्या बहिनीची मुलगी रंजना मोरे असे वॉकिंग करणे करीता फिर्यादीच्या घरापासुन सोलापुरकडे जाणारे बायपास रोडवरुन बनशंकरी कॉलनीकडे जाणा-या रोडवरुन पायी जात असताना
समोर एक मोटारसायकल थांबवुन अनोळखी माणूस उभारलेला दिसला त्यांनी मला सांगीतले की मी पोलीस आहे मला पोलीस ठाणेकडून रोज संध्याकाळी पायी चालत येणा-या जाणा-या लोकांवर नजर ठेवण्यासाठी ड्युटी नेमली आहे.
मी पोलीसच आहे असे सांगुन पुढे चो-या होत आहेत तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा त्या सुरक्षित राहतील असे म्हणालेवर फिर्यादी घाबरुन हातातील पाच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या काढत असताना त्याने त्याचेकडील कागद फिर्यादी समोर धरला फिर्यादीच्या बांगड्या त्यात घातल्या त्याने कागद गुडाळुन फिर्यादीकडे परत दिले .
त्यानंतर फिर्यादी परत घरी येत असताना सुमारे अर्ध्या तासानंतर सदर कागद उघडुन बधीतले असता सदर कागदामध्ये दोन सोन्याच्या पाटल्या ऐवजी त्यात तीन नकली पिवळे धातुचे बांगड्या व छोटासा दगड दिसुन आले.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक नागेश बनकर हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज