mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; शेतकऱ्यांना होणार लाभ: पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी काय आहे?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 17, 2025
in राष्ट्रीय
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता कधी मिळणार याची उत्सुकता असतानाचा आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये पीएम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

24 हजार रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या, विविध 36 योजनांना एकत्र आणलेल्या पीएम धन-धान्य कृषी योजनेला केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती, केंद्रीय प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

या योजनेमुळे देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तत्पूर्वी, यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी या योजनेची घोषणा केली होती. आता, केंद्र सरकारने 2005 पासून पुढील 6 वर्षांसाठी या योजनेस मंजुरी दिली आहे.

पिकांच्या कापणीनंतर साठवण क्षमता वाढविण्याच्या कामात या योजनेचं मोठं योगदान असणार आहे. पेरणीच्या सुविधांमध्येही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असून देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. या योजनेच्या माध्यमातून 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.

पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी काय आहे?

पीएम धन धान्य कृषी योजनेअंतर्गत देशाभरातील 100 जिल्ह्यांची निवड केली जाणारं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी आहे, त्यांचा या 100 जिल्ह्यांमध्ये समावेश केला जाईल. शेतीच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या विविध 36 योजनांना एकत्र करून शेतीचा विकास करण्यावर यात भर दिला जाईल.

राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना राबवली जाईल. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशभरातल्या एकूण 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणारं आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारं, बी-बियाणे, खत खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाईल. यासोबतच या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल? यावरही काम केलं जाईल.

शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार?

योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित केलं जाईल. पिकाची साठवणूक तसेच सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच उच्च गुणवत्ता असलेले बी-बियाणे शेतकऱ्यांना पुरवले जातील.

कृषी उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा पुरवठा केला जाईल. सोबतच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी पंप आदी उपकरणं घेण्यासाठीही अर्थसहाय्य केले जाईल. याच योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. ग्रामीण क्षेत्रात रोजगाराची संधी कशी वाढेल, याकडे लक्ष दिले जाईल. यामुळेच आगामी काळात शेती क्षेत्रात बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान धनधान्य कृषी योजना मुख्य ठळक मुद्दे

पीएम धनधान्य कृषी योजनेच्या मुख्य ठळक वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

लक्ष्यित कृषी विकास: सरकारने कमी उत्पादकता, मध्यम पीक वाढ आणि देशभरात मर्यादित कर्ज उपलब्धता असलेले १०० जिल्हे ओळखले आहेत – ही योजना १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत करेल.
शाश्वत आणि हवामान-प्रतिरोधक शेती: हा उपक्रम उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान-विशिष्ट शेती, पाण्याची कार्यक्षमता आणि अचूक शेतीचा अवलंब करण्यास प्रेरणा देईल.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य: ही योजना अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज सहाय्य प्रदान करेल, ज्यामुळे आधुनिक उपकरणे, दर्जेदार बियाणे आणि प्रगत शेती तंत्रे अधिक सुलभ होतील.

कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांचा विकास: या उपक्रमामुळे पंचायत आणि ब्लॉक पातळीवर कार्यक्षम साठवणूक, गोदाम आणि रसद पुरवून कापणीनंतरचे नुकसान कमी होईल.

सिंचन विस्तार: ही योजना सिंचन व्याप्ती वाढवेल आणि पीक तीव्रता आणि उत्पन्न स्थिरता वाढविण्यासाठी कार्यक्षम पाणी वापर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देईल. तंत्रज्ञान एकत्रीकरण: ही योजना उत्पादन वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण शेती साधनांना प्रोत्साहन देते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पीएम धन धान्य योजना

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कमी होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती…

January 26, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! विना OTP ही उडू शकतात खात्यातून पैसे, फोनमध्ये शिरतोय नवीन वायरस, यापासून कसं वाचाल? ही गोष्ट लक्षात ठेवा

January 22, 2026
मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंच विधान चर्चेत; सत्ताधाऱ्यांवर केली ‘ही’ सडकून टीका

मोठी बातमी! सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री होणार? पवार गट NDAमध्ये जाणार? ताईंनी थेट सांगितलं

January 10, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बाबो..! ‘मी कोणतीही टक्केवारी खाणार नाही’, उमेदवाराचं नाद खुळा शपथपत्र; गावभर चर्चा; स्टॅम्पवर दिलेल्या शपथपत्रात काय नमूद केले?

January 10, 2026
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

मोठी संधी! शासकीय सेवेत अग्निविर जवानांना नोकरी देणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

January 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

कामाची बातमी! एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

January 16, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 8, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! राज्य सरकारला दणका; अखेर ‘ते’ परिपत्रक केलं रद्द

December 25, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली; UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू

December 27, 2025
Next Post
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मोटार चालू करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यावर मिस्टर सरपंचांनी केला लोखंडी पान्याने हल्ला; शेतकरी गंभीर जखमी; गावात संतापाची लाट

ताज्या बातम्या

कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

January 27, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कमी होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती…

January 26, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

ZP., पंचायत समित्यांत ‘स्वीकृत सदस्य’ येणार? अभ्यासू व तज्ज्ञ व्यक्तींचा अनुभव जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी होणार

January 25, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; 4 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला; अवैध धंद्याची माहिती स्थानिक पोलीसांना कशी काय होत नाही?

January 25, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

राजकीय घडामोड! जिल्हा परिषद दामाजी नगर गटातून ‘या’ बड्या नेत्यानी घेतली माघार; पहिल्याच दिवशी एकमेव अर्ज मागे

January 24, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा; एका कॉलवर प्रश्न सुटणार

January 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा