टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १५ जागेसाठी ३१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजय वाघमारे यांनी दिली.
शहरांमध्ये असलेल्या बँकांमधील ही प्रमुख बँक असून या बँकेच्या राज्यात १० शाखांद्वारे खातेदारांना सेवा दिली जाते.
पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी एका उमेदवाराच्या अर्जाला छाननी दरम्यान हरकत घेण्यात आली तो ही अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
आता ३१ उमेदवाराचे अर्ज आखाड्यात शिल्लक आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम १५ जुलै असून यामध्ये कोण कोण उमेदवारी अर्ज माघार घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
मात्र काही दाखल अर्ज शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांना माननारे असल्यामुळे येथील काही जागा बिनविरोध निर्णयाची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुक बिनविरोध झाली पाहिजे
बँकेच्या निवडणुका या आर्थिकदृष्ट्या बँकेला परवडणाऱ्या नसतात, निवडणूक खर्चाचा भारदेखील बँकेवर पडत असल्यामुळे या निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांशी चर्चा करून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.- राहुल शहा,
मंजूर अर्ज उमेदवारांची नावे
संतोष बुरकुल, नागन्नाथ राऊत, मुझप्फर काझी, सुभदा शहा, जमीर सुतार, अमृतलाल पुरवत, अजिम शेख, चंदाराणी कोडुंभैरी, विवेकानंद शहा, राजेंद्रकुमार जाधव, तेजस्विनी सलगरकर, राहुल शहा, गजानन हजारे, मच्छिंद्र चव्हाण, अश्विनी शहा,
गोविंद गाडे, शशिकांत भोसले, (सर्वसाधारण) उत्तम खांडेकर, मच्छिंद्र चव्हाण, (भ. ज.), रेश्मा जगताप, शशिकांत भोसले, किरण क्षिरसागर (अ. जा.), स्नेहल धट, महादेव माळी, जमीर सुतार, अरुणा माळी (इतर मागास), अरुणा माळी, अश्विनी शहा, गोदावरी दत्तु, चंदाराणी कोडुंभैरी (महिला).
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज