मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पेट्रोलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. दिल्लीमध्ये १ जुलैपासून पेट्रोल पंपावर बदल होणार आहे. आता १० वर्षांपेक्षा जून्या वाहनांना डिझेल आणि १५ वर्षांपेक्षा जास्त जून्या वाहनांना पेट्रोल मिळणार नाहीये.
त्यामुळे या वाहनांना आजपासून पेट्रोल-डिझेल दोन्ही मिळणार नाहीये. जवळपास या वाहनांची संख्या ६२ लाख आहे. त्यामुळे ६२ वाहनांना आता इंधन मिळणार नाहीये.
वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोग (CAQM)च्या आदेशानंतर हा नियम लागू करण्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
नियम का लागू केला?
दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या वाहनांची निर्धारित वय पूर्ण झाली आहेत. त्यांना आता पेट्रोल डिझेल मिळणार नाहीये. त्यामुळे रस्त्यावर आता १० ते १५ वर्षे जूनी वाहने धावणार नाहीयेत.
या वाहनांमुळे येणाऱ्या धुरामुळे खूप वायू प्रदुषण होत होते. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
पेट्रोल पंपावर कडक नजर
या नियमांची अंबलबजावणी केली जाणार आहे. यासाठी दिल्ली सरकारची पेट्रोल पंपावर कडक नजर असणार आहे.
यासाठी दिल्ली सरकारचा वाहतूक विभाग, दिल्ली पोलिस, वाहतून पोलिक आणि महानगरपालिका एकत्रितपणे काम करतील.याअंतर्गत पेट्रोल पंपावर अधिकारी तैनात केले जातील आणि जुन्या वाहनांवर लक्ष ठेवले जातील.
जुन्या वाहनांना अडचणी
जर एखादे वाहन १० किंवा १५ वर्षे जूने असेल तर त्यांना इंधन मिळणार नाहीये. या परिस्थितीत त्यांना नवीन वाहन खरेदी करावे लागेल किंवा जुने वाहन स्क्रॅप करावे लागेल. सरकारचा असा विश्वास आहे की, या निर्णयामुळे दिल्लीतील वायूपदुषण कमी होईल. नागरिकांना या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज