mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 27, 2025
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पाण्यासाठी गेली ३३ वर्षे अविरत संघर्ष सुरू आहे. हा लढा थांबता कामा नये. आता तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला-मंगळवेढा व वंचित भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी, असे स्पष्ट प्रतिपादन पाणी परिषदेचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले. शेटफळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या ३३ व्या पाणी परिषदेत प्रा. शिवाजीराव काळुंगे बोलत होते.

या परिषदेत टेंभू उपसा सिंचन योजनेला क्रांतीवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक आणि एकमुखी ठराव पारित करण्यात आला.

याप्रसंगी निमंत्रक वैभवकाका नायकवडी,  माजी आ.राजेंद्रअण्णा देशमुख, आ.डॉ.बाबासाहेब देशमुख, अ‍ॅड.सुभाष पाटील, प्रा.आर. एस. चोपडे, प्रा.बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर, प्रा.दत्ताजीराव जाधव, गौरव नायकवडी, सचिन देशमुख, आनंदराव पाटील, शिवाजीराव पाटील, ॲड.भारत पवार, प्रा. येताला भगत यांचेसह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे काळुंगे म्हणाले, क्रांतीवीर स्व.नागनाथअण्णांनी दुष्काळी भागाला पाण्याचे स्वप्न दाखवले, तेव्हा लोकांना विश्वास वाटत नव्हता. पण आज ते सत्यात उतरले आहे. स्व.भाई गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळात या लढ्याचे उत्तम प्रतिनिधित्व केले. स्वातंत्र्यानंतरची ही ऐतिहासिक चळवळ आता शेवटच्या टप्प्यावर आहे.

सूर्यासारखे तेजस्वी काम क्रांतीवीर स्व.नागनाथअण्णा आणि भाई स्व.गणपतराव देशमुख यांचे आहे. त्यांच्या नेतृत्वातच सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच आणि सोलापूर जिल्ह्यातील तीन दुष्काळी तालुक्यांसाठी आटपाडी केंद्रस्थानी ठेवून या चळवळची सुरुवात झाली. त्यांच्या संकल्पनेतूनच टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी यासारख्या तीन महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी झाली.

कृष्णा नदीवरील म्हैसाळ योजनेचे पाणी पाच टप्प्यांत उचलून थेट सांगोला व मंगळवेढा तालुक्यात पोहोचले आहे. हे त्यांचे दूरदृष्टीचे उदाहरण आहे. टेंभूचे पाणी वाढेगावपर्यंत आले आहे, ते माण नदीतून ओझेवाडीमार्गे भीमा नदीपर्यंत पोहचले, तर संपूर्ण मंगळवेढा भागालाही त्याचा लाभ होईल.

येत्या काही दिवसात चळवळीतील सर्वांनी एकत्रित येऊन पाणी परिषदेत समाविष्ट असणाऱ्या तालुक्यांचा दौरा काढून अपूर्ण जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेऊ आणि पुढील पाणी परिषद अधिक योजनाबद्ध पद्धतीने पार पाडू असेही त्यांनी स्पष्ट केले.

वैभव नायकवडी म्हणाले, ज्यांना पाणी आले आहे त्यांनी वंचित भागासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अपूर्ण योजना तातडीने पूर्ण व्हाव्यात, यासाठी चळवळ अधिक संघटीत करावी.

स्व.नागनाथअण्णा नायकवडी आणि कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष स्व. आ.भाई डॉ. गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेतून अथकपणे पाण्यासाठी लढा उभा राहिला. त्यामुळे अतीतटीच्या भागात पाणी आल्याने दुष्काळग्रस्त हे नाव पुसले जात आहे.

शेतात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही, या ध्यासाने पाण्यासाठीची संघर्ष चळवळ उभी राहिली. ज्या योजना कागदावर होत्या त्या प्रत्यक्षात आंमलात आल्या आहेत. मिळालेले पाणी समन्वयाने टिकवावे लागणार आहे.  योजनेच्या पूर्ततासाठी सर्वांनी संघटीत होऊन काम करणे ही गरज आहे.

आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी यंदा पाण्याचा पुरवठा एक महिना उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करून नियोजन अधिक काटेकोर करण्याची गरज व्यक्त केली.

गौरव नायकवडी यांनी, पाणी आले म्हणून सारे प्रश्न सुटले असे नाही, अजूनही बरेच काम बाकी आहे, असे सांगून टेंभू योजनेस अण्णांचे नाव देण्याची मागणी केली.

माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भवानी विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या २७ वर्षांच्या लढ्याची आठवण करून दिली. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी थेट बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी ॲड. सुभाष पाटील, हणमंतराव देशमुख, व्ही. एन. देशमुख, विष्णूपंत चव्हाण, प्रा. आर. एस. चोपडे, शिवाजीराव पाटील, सचिन देशमुख, आनंदराव पाटील, ॲड. भारत पवार यांनीही आपली मते मांडून सिंचन योजनेविषयी जनतेच्या भावना अधोरेखित केल्या.

प्रास्ताविक बाळासाहेब नायकवडी तर स्वागत प्रा. सी.पी. गायकवाड यांनी केले. परिषदेचे सूत्रसंचालन आर. बी. गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी तेरा दुष्काळी तालुक्यांच्या शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असलेल्या या परिषदेत अनेक मागण्या आणि जवळपास वीस ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पाणी संघर्ष परिषद

संबंधित बातम्या

सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

April 19, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! खेळता खेळता शेततळ्यात पडून दोन वर्षीय चिमुरड्याचा अंत; मंगळवेढ्यातील हृदयद्रावक घटना

April 18, 2026
​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
Next Post
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

ताज्या बातम्या

सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

April 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..