टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री.रामचंद्र नागनाथ सलगर (शेठ) सोशल फॉउंडेशन मंगळवेढा व सुपनर श्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रामचंद्र सलगर शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त
उद्या दि.1 जून रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजक राहुल सलगर यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय धर्मगाव येथे रविवार दि.1 जून रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आरोग्यतज्ञ डॉ. सौ. सुनिता सुपनर-दोलतोडे [डी.आर.सी.एच.बी.ए.एम.एस. (स्त्रीरोग तज्ञ प्रसुतीतज्ञ) या तज्ञ डॉक्टर आरोग्य तपासणी करणार आहेत.
शिबिरात जनरल मेडिसीन (सदी, खोकला, थंडी, ताप) यावर उपचार, गर्भवती महिलाना मार्गदर्शन, किशोरवयिन मुलींना मार्गदर्शन, सिझेरियन डिलेव्हरीचे वाढते प्रमाण यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
उद्या होणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषध वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक राहुल सलगर यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज