मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर असून, सकाळी साडेआठ वाजता सोलापूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे.
त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते आढावा बैठक घेणार आहेत.
आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच भूमी अभिलेख विभागाचा आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता त्याठिकाणी स्थानिक आमदारांसोबत त्यांची बैठक नियोजित आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त दुपारी २ वाजता आयोजित कार्यक्रमासाठी ड्रीम पॅलेस येथे हजेरी लावणार आहेत. आज दुपारी ४ वाजता शिवस्मारक येथे भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
या बैठकीला महसूल मंत्री बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत. साडेपाच वाजता सोलापूर विमानतळाकडे रवाना होतील. त्यानंतर पावणे सहा वाजता विमानाने ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज