mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तणाव वाढला! पाकिस्तानातील रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद एयरबेसवर भारताचा हल्ला; पाकिस्तानचा दावा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 10, 2025
in राष्ट्रीय
पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले; भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद एयरबेसवर मध्यरात्री ड्रोनचा जोरदार हल्ला झाला. पाकिस्तानच्या अनेक शहरात ब्लॅकआऊट होते. अनेक शहरावर ड्रोन घिरट्या घेत होत्या. पाकिस्तानमधील तीन एअरबेसवर जोरदार ड्रोन हल्ला करण्यात आलााय.

भारताने हा हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानकडून मध्यरात्री पत्रकार परिषद घेत भारतावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही युद्धाची सुरूवात झाली आहे. भारताने पाकिस्तानसह अफगाणिस्तानवरही ड्रोनचा हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

भारताकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, पाकिस्तानमधील स्थानिक मिडिया आणि सोशल मीडियातील पोस्टनुसार पाकिस्तानमधील अनेक शहरात मध्यरात्री ड्रोनने जोरदार हल्ला झाला आहे. लोक रस्त्यावर उरल्याचेही काही व्हिडिओतून दिसत होते.

पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस आणि त्याशिवाय लाहोर, इस्लामाबादमध्येही शुक्रवारी मध्यरात्री जोरदार स्फोट झाल्याची माहिती मिळाली. मध्यरात्री झालेल्या या स्फोटांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे.

भारताने नूर खान, मुरिद आणि रफीकी या तीन हवाई तळांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानकडून मध्यरात्री पत्रकार परिषद घेण्यात आली. लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, सर्व हवाई तळ आणि लष्करी मालमत्ता सुरक्षित असून कोणतेही नुकसान झालेले नाही.

पाकिस्तानी माध्यमांनुसार, रावलपिंडी आणि लाहोरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री अनेक ठिकाणी स्फोटांचा आवाज ऐकू आला. यातील एक स्फोट नूर खान एअरबेसजवळ झाला.

या घटनेनंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली आहे. लाहोर, इस्लामाबाद आणि पेशावर येथील विमानतळांवर विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

दुसरीकडे, भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचा आरोप केला आहे. भारतीय लष्कराने म्हटले आहे की, पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील जम्मू, उधमपूर आणि पंजाबमधील पठाणकोट येथील लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला.

भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले. भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तरादाखल रावलपिंडीतील नूर खान एअरबेसवर अचूक हल्ला केल्याचा दावा काही भारतीय माध्यमांनी केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव सुरू झाला. पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे ९ तळ नष्ट केले.

तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या वाढत्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. फ्रान्स आणि चीनसह अनेक देशांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि शांततापूर्ण चर्चेचे आवाहन केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऑपरेशन सिंदूरभारत पाकिस्तान युद्ध सुरू

संबंधित बातम्या

Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 3, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
Next Post
ऑपरेशन सिंदूर! भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात वारी परिवार व माजी सैनिकांची तिरंगा सायकल रॅली; हम सब भारतीय है, हिंदू-मुस्लिमांनी दिला नारा

ऑपरेशन सिंदूर! भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात वारी परिवार व माजी सैनिकांची तिरंगा सायकल रॅली; हम सब भारतीय है, हिंदू-मुस्लिमांनी दिला नारा

ताज्या बातम्या

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 17, 2026
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा! अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग; मंगळवेढ्यात संताप, १७ वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

June 17, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो सावधान! नळाला कॉक लावा, अन्यथा थेट दंडात्मक कारवाई; नगरपरिषदेचा कडक इशारा

June 17, 2026
शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

June 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

महायुती सरकारचं मोठं पाऊल, ‘या’ शहरामध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास

June 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा